gitanjali express.jpg
gitanjali express.jpg 
महाराष्ट्र

गितांजली एक्‍सप्रेसमधील बॅग चोरांच्या मुसक्‍या आवळल्या 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मध्य रेल्वेच्या विविध एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळ्यावर रेल्वे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अशाच गितांजली एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळीच्या रेल्वे पोलिसांनी हुकूमदेव राजकुमार यादव (वय २७) या संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या आहे. 

रेल्वेतील चोरट्यांच्या टोळ्या पोलिसांच्या रडारवर 
दिवाळीसाठी रेल्वेला गर्दी वाढली आहे. विशेष गाड्या वाढविल्यानंतरही रेल्वे भरभरुन धावत आहे. दूरपल्याच्या रेल्वेगाडीत होणारी गर्दी लक्षात घेउन प्रवाशावर पाळत ठेऊन चोऱ्या करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहे. वेगवेगळ्या गाड्यात वेगवेगळ्या टोळ्यांतील बॅग लिफ्टर आणि भुरट्या चोरांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अशा टोळ्यावर लक्ष केंद्रीत करीत पोलिसांनी महिणाभरात आतापर्यत तीन वेगवेगळ्या घटनात संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. काल गुरुवारी आणखी एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांनी यश आले. 

संशयितांना अटक

समिर कार्तीक पात्रा ( वय २१) मुंबई सेंट्रल हे १८ ऑगस्टला (१२८५९) डाऊन गिताजंली एक्‍सप्रेसच्या एस ८ मध्ये सिट नंबर २३ वर झोपून प्रवास करीत असताना ते झोपले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातून एक खाकी रंगाची पर्स ४५०० रूपये रोख व कागदपत्रे चोरटयाने चोरून नेले. झोपेतून उठल्यावर समीर पात्रा यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. काल गुरुवारी (ता. १७) प्रभारी निरीक्षक अशोक रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष दत्तात्रेय उफाडे,महेश सावंत, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान कैलास बोडके, प्रेम चौधरी गस्त घालत असतांना त्यांना प्रवासी गर्दीत मिसळून चोरी करतांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्याच्या कडुन गुन्हयात २ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली. हुकूमदेव राजकुमार यादव (वय २७)  या संशयिताला अटक केली. - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT