Bajrang Sonawane And Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bajrang Sonawane: देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीचे खासदार; भाजपच्या मेळाव्यात नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis: दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनीही, त्यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा थोडा अधिक वाटा आहे असे विधान केले होते.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीनंतर लागलेल्या निकालात महाराष्ट्रात भाजपला मतदारांनी जोरदार घक्का दिला आहे. यानंतर पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, पक्षातील नेतेच ऐकमेकांवर आरोप करत आहेत. याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाकडे आपल्याला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान आज मुंबईमध्ये भाजपच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यामध्ये फडवणीसांनी भाजपच्या पराभवाची कारणे सांगताना पक्षाविरोधात खोट्या अफवा पसरवल्यामुळे फटका बसल्याचे म्हणाले.

यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देताना परभणीचे खासदार बंडू जाधव आणि बीडचे नवनिर्वाचित खासदार यांच्या एका विधानाचा दाखला देत, विरोधकांचा विजय कशामुळे झाला हे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या 11 जागा 1, 2 किंवा 3 टक्क्यांपेक्षा कमी मताने पडल्या आहेत. त्यासाठी त्यांनी धुळे मतदार संघाचे उदाहर दिले आणि म्हणाले, परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार स्पष्टपणे म्हणत आहेत की, मराठा समाज्यापेक्षा त्यांना मुस्लिम समाजाने जास्त मते दिली आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनीही, त्यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा थोडा अधिक वाटा आहे असे विधान केले होते.

यावरून देवेंद्र फडवणीस यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारच्या कालात आपण दोन वेळा मराठा आरक्षण दिले, मराठा समाजासाठी तसेच मराठा समाजाच्या विद्यांर्थ्यांसाठी विविध सुविधा दिल्या तरी याचा फटका आपल्याला बसला. यासाठी भाजप विरोधात पसरवलेला खोटा समज कारणीभूत आहे. पण उलट ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पारड्यात मते गेली. पण, हा प्रकार या निवडणुकीत चालला असले तरी इथून पुढे चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT