गूगल
गूगल 
महाराष्ट्र

बालाकोटला महाराष्ट्रात दिवसभर सर्वाधिक सर्चिंग

शेखलाल शेख

औरंगाबाद - भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर मंगळवारी (ता. 26) 'भारतीय वायुदल' आणि 'बालाकोट' हे शब्द दिवसभर गुगल सर्चच्या ट्रेंडमध्ये अग्रस्थानी राहिले. मंगळवारी "बालाकोट' या नावाने सर्वाधिक पाकिस्तानमधून आणि त्याखालोखाल भारतातून सर्च झाले. देशाचा विचार केला तर महाराष्ट्रातून "बालाकोट' नावाने गुगलवर सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेंडमध्ये दिसते. पाकिस्तानमध्ये बालाकोट कुठे आहे, त्याचे मॅप, भारतापासूनचे अंतर, भारतीय एअरफोर्स नावाने दिवसभर गुगलवर माहिती घेण्यासाठी नेटीझन्सकडून सर्चिंग झाले. 
 

अरब राष्ट्रातून सर्वाधिक 
 भारतीय वायुदलाच्या तडाख्याने बालाकोट जगभर चर्चेत आले. हे ठिकाण पाकिस्तानात नेमके कुठे आहे, त्याचा नकाशा, बातम्या, छायाचित्रे, भारतापासूनचे अंतर याची माहिती घेण्यासाठी गुगलवर दिवसभर सर्चिंग सुरू होते. मंगळवारच्या गुगल सर्चच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पाकिस्तानमधूनच या नावाने सर्वाधिक सर्च झाले. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. यासोबतच संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, बहारीन, नेपाळ, सिंगापूर, कुवेत, सौदी अरेबिया अशा टॉप टेन देशांतून नेटीझन्सने सर्चिंग केले आहे. टॉप दहा देशांचा विचार केला तर यामध्ये अरब राष्ट्रांतून बालाकोटची माहिती घेण्यासाठी जास्त सर्चिंग झालेले आहे. 
 
देशात महाराष्ट्र टॉपवर 
गुगल सर्चमध्ये देशाचा विचार केला तर मंगळवारी महाराष्ट्रामधून "बालाकोट' नावाने सर्वाधिक सर्च झाले. त्याखालोखाल कर्नाटक, जम्मू काश्‍मीर, दिल्ली, सिक्कीम, हरियाणा, गोवा, उत्तराखंड, दमण, दीव, गुजरात या राज्यांचा टॉप टेनमध्ये क्रमांक लागतो. सर्चिंगमध्ये देशातील शहरांचा विचार केला तर गुरुग्राम, पिंपरी चिंचवड, नोएडा, गांधीनगर, खरगपूर येथून सर्वाधिक सर्चिंग करण्यात आले आहे. यामध्ये बालाकोट ऍटॅक, बालाकोट मॅप, बालाकोट स्ट्राईक, पीओके, पीओके बालाकोट यांचा समावेश आहे. यासोबत रिलेटेट टॉपिकचा विचार केला तर इंडियन एअरफोर्स नावाने दिवसभर सर्वाधिक सर्च झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT