raj thackeray
raj thackeray esakal
महाराष्ट्र

Raj Thackeray : ...जेव्हा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंच्या शाळेत पोहोचले; राज यांनी सांगितली आठवण

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज ठाकरे यांनी आज शालेय जीवनातील आठवणींना आज उजाळा दिला. शाळेतला खोडकर स्वभावामुळे शिक्षकांनी त्यांनी शिक्षा केली होती. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये चक्क बाळासाहेब ठाकरे पोहोचले होते.

राज ठाकरे यांनी 'एबीपी माझा'च्या मुलाखतीमध्ये शालेय जीवनातला किस्सा सांगितला. एका मुलाला शिवी दिल्यामुळे राज ठाकरेंसह आणखी एकाला शिक्षकांनी वर्गाबाहेर उभं केलं होतं. उपाशीतापाशी वर्गाबाहेर उभं केल्याने शेवटी बाळासाहेब ठाकरे दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचले. नंतर शिक्षिकांची उडाडेली भंबेरी त्यांनी सांगितली.

काय म्हणाले राज ठाकरे?

एके दिवशी मी शाळेत गेलो, वर्गात बसलो. शिपाई आला, ठाकरे नावाने आवाज दिला. माझ्याबरोबर रांगडेकर नावाच्या विद्यार्थ्यालाही बोलावलं. आम्हांला बाहेर गॅलरीत उभं रहायला सांगितलं. एक-दोन तास नव्हे तर शाळा सुटेपर्यंत आम्हांला तसंच उभं केलं. जातांना पालकांना घेऊन यायला सांगितलं होतं. परंतु हीच त्यांची चूक झाली.

दुसऱ्या दिवशी पुन्हा मला बाहेर बोलावलं. दुसऱ्या एका खोलीत दोन्ही क्लासटिचर उभ्या होत्या, रडत होत्या आणि बाजूला बाळासाहेब आणि माझे वडील बसलेले होते. मी कुणालातरी काहीतरी बोललो होतो, परंतु त्याचा एवढा मोठ परिणाम होईल, असं वाटलं नव्हतं.

अशा आठवणी राज ठाकरेंनी सांगितल्या. दोन वर्षांनंतर पुन्हा बोलावणं आलं. मी दुसऱ्या वर्गात गेलो. एका मुलाने शिवी दिल्याची तक्रार केली होती. त्याच क्लासटिचर तिथे होत्या. त्या स्वतःहून म्हणाल्या तू शिवी दिलीच नसशील. तू जा वर्गात. हा जुना किस्सा राज यांनी शेअर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT