Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: 'बाळासाहेंबानी मोदी, शाहांना वाचवलं होतं, त्याचे पांग मला संपवून फेडणार का?', ठाकरेंचा सवाल

मला संपवून दाखवाच उद्धव ठाकरे यांचं मोदी शाह यांना आव्हान

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग आहे. या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंनी आपली रोखठोक मतं मांडताना दिसून आले. या मुलाखतीत त्यांनी हिंदुत्वापासून विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या बैठकीवर, महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सद्याची राजकीय परिस्थीती या संपुर्ण परिस्थितीवरही परखड भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपला लक्ष केलं आहे.

मुलाखतीवेळी संजय राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न केला की, देशात भल्याभल्यांनी ईडी, सीबीआय यांच्यासमोर शरणागती पत्करली तुम्ही का नाही पत्करली, यावर उध्दव ठाकरेंनी उत्तर देताना राऊत यांना प्रतिप्रश्न केला की, तुम्ही का नाही पत्करली शरणागती, त्यावर पुन्हा राऊत म्हणाले, तुम्ही शरणागती पत्करावी म्हणून त्यांनी अनेक प्रयोग केले तुमची काय भूमिका आहे.

यावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले की, कोणी एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोघांना वाचवलं होतं. माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना. त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा. बघू या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे, परंतु ही लढाई कशासाठी करायची आम्ही तुमच्या सोबत होतो, खरं म्हणजे तुम्ही देशाच्या शत्रुशी लढायला पाहिजे, पक्षाच्या शत्रुशी नाही, असंही ठाकरे पुढे म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत

'आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत', असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT