balasaheb thakare shivsena esakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेब म्हणाले होते...‘उद्धव अन्‌ आदित्यला सांभाळा’! जिल्हाप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत

आम्ही सरकारचे नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, अशी भूमिका जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. स्व. बाळासाहेबांनी सांगितले होते, ‘माझ्या मागे उद्धव अन्‌ आदित्यला सांभाळा’, याची आठवणही त्यांनी सांगितली.

तात्या लांडगे

सोलापूर : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्यच असेल. आम्ही सरकारचे नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, अशी भूमिका जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. स्व. बाळासाहेबांनी सांगितले होते, ‘माझ्या मागे उद्धव अन्‌ आदित्यला सांभाळा’, याची आठवणही त्यांनी सांगितली.

जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून त्यात पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धनंजय डिकोळे आणि संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे यांनी पक्ष सोडला. तरीही, पक्षाला काहीच फरक पडला नाही. आता एकनाथ शिंदे हे पक्ष सोडणार नाहीत, तरीदेखील त्यांच्या बंडामुळे पक्षावर काहीच परिणाम होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सरकार येतील-जातील, पण शिवसेना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर भक्कमपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण, आमदारांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुखांनी प्रत्येक तालुकाप्रमुखाशी संपर्क ठेवायला सुरू केला आहे. दरम्यान, मागील अडीच वर्षांत ‘आमचे महाविकास आघाडीचे सरकार’ म्हणून गाजावाजा करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. आता प्रत्येकजण, आम्ही शिवसेनेचे सैनिक असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत आम्ही असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे.

‘काँग्रेस’मधून पक्षांतर वाढण्याची भीती
आगामी काही महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषदेसह नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. राज्यात सत्ता असतानाही मंत्र्यांनी, आमदारांनी त्यांच्या मतदार संघाशिवाय इतर मतदारसंघांकडे फारसे लक्ष दिले नाही. ‘शहर मध्य’च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी निधी आणला, पण त्यांच्याच मतदारसंघात सर्वाधिक खर्च केला. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून आम्हाला निधी मिळत नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर करूनही त्या नगरसेवकांना पुरेसा निधी मिळाला नाही. आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेशी टक्कर देताना आपला विजय कठीण होईल, अशी चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यास महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांतर वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

भरणेमामा नसतील तर ‘त्यांना’ साथ कोणाची?
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आनंद चंदनशिवे, महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यू. एन. बेरिया यांच्यासह अनेकांना विकासकामांसाठी भरपूर निधी दिला. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच सर्वांत स्ट्राँग पक्ष असल्याचा आत्मविश्वास बाळगून त्यांनी पूर्वीच्या पक्षाला रामराम ठोकून पक्षांतराची वाट धरली. पण, राज्यातील सरकार कोसळल्यास पालकमंत्री भरणे हे इंदापूर येथेच असतील. त्यावेळी राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक नेत्यांना कोण बळ देणार, असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

भाजपमधील नाराज झाले शांत
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल की नाही, याची चिंता काही जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांना तथा इच्छुकांना होती. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतून नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पण, माध्यमांवर लक्ष ठेवून राज्यातील प्रत्येक राजकीय घडामोडीवर लक्ष देत त्यांनी पक्षांतराचा विचार बदलल्याचीही चर्चा आहे. आपला नेता दुसऱ्या पक्षात गेल्याने काहीजण निवडणुकीपूर्वी त्यांच्यासोबत जाण्याच्या प्रयत्नात होते, आता त्यांनीही विचार बदलला आहे.

...तर आताचे सख्खे मित्र होतील पक्के शत्रू
भाजपला सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर तिन्ही पक्षांनी बहुतेकवेळा केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध आंदोलने केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर कडव्या शब्दांत आरोप-प्रत्यारोप केलेले नेते, पदाधिकारी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून भाजपविरुद्ध काम करू लागले. पण, आता राज्यातील सरकार कोसळल्यावर तेच नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार पुन्हा एकदा एकमेकांवर टीका करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून प्रचार करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT