congress leader balasaheb thorat  sakal
महाराष्ट्र बातम्या

स्वबळावर विचारमंथन: काँग्रेससमोरील कठीण काळ संपेल-थोरात

स्वबळाचा विचार करताना भाजपला फायदा होणाार नाही याचाही विचार करीत आहोत.

प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा

नगर : ‘‘स्वबळाचा नारा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पण स्वबळाचे फायद्याबरोबरच तोटेही आहेत. स्वबळाचा विचार करताना भाजपला फायदा होणाार नाही याचाही विचार करीत आहोत. कोणत्या पद्धतीने पुढे जायचे या बाबत विचारमंथन सुरू आहे,’’ असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (Political News)

काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘काँग्रेस विचारसरणीसाठी कठीण काळ सुरू आहे. काँग्रेसचे तत्वज्ञान हे राज्यघटनेशी निगडित आहे. समाजसुधारक, संतांच्या विचारांवर आधारित असलेल्या राज्यघटनेचे प्रतिबिंब झालेले दिसते. सर्वांना समान संधी, व्यक्ती स्वातंत्र्य, समाजवादी समाजरचना पक्षाला अभिप्रेत आहे. सध्या भाजप जे राजकारण करत आहे, ते धर्मावर आधारित आहे. सध्या कट्टरवादाचा ट्रेंड जगभरात दिसतो. जातिधर्माचे राजकारण करणे सोपे असते. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कठीण काम काँग्रेस करीत आहे. पक्षासाठी काळ कठीण असला तरी तो कायम कठीण असेल असे नाही.’’

भाजपला सत्तेपासून दूर ठेवले

महाविकास आघाडी सरकाच्या कारभारावर बोलताना थोरात म्हणाले, की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीत साम्य आहे. आम्ही शिवसेनेला बरोबर घेतले. सुरुवातील सोनिया गांधी यांचा याला विरोध होता. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे होते. भाजपची विचारसरणी समाजास घातक आहे. ही गोष्ट एक दिवस लोकांच्या लक्षात येईल. भाजप ज्या पद्धतीने समाजात विष कालवितो तसे शिवसेनेचे नाही. शिवसेनेला प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजचे आहे. शिवसेनेने या पूर्वी अनेक वेळा काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधानांवर अशी टीका नको

नाना पटोले यांचे मोदीविषयींचे विधान कितपत योग्य होते, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की एक काळ असा होता, की दोन पक्षाचे नेते निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात भाषणे करायचे व सायंकाळी मात्र सोबत जेवण करायचे. त्यावेळी खिलाडूवृत्तीचे राजकारण पाहायला मिळायचे. पक्ष, मतमतांतरे मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. पण त्याला व्यक्तिगत स्वरूप देणे लोकशाहीला अभिप्रेत नाही. २०१४ नंतर असे प्रकार वाढले आहेत. देशात व्यक्तिद्वेष वाढला असून सोशल मीडियावर पराकोटीची बदनामी होताना दिसते, असे होऊ नये. राजकारणात निव्वळ मवाळ भाषा चालत नाही. पटोले यांची भाषा आक्रमक आहे. ते स्पष्टपणे मांडणी करत असतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशा प्रकारे केली जाऊ नये, असे मतही थोरात यांनी व्यक्त केले.

थोरात म्हणाले...

  • काँग्रेसची ताकद जनमानसात असतेच

  • मध्यंतरी विखे दुसऱ्या पक्षातून आले. आणि पुन्हा गेले. यात आमचे नुकसान होते

  • आमच्या सरकारने अतिवृष्टी, महापूर, कोरोना व चक्रीवादळ या संकटात उत्तम काम केले

  • सरकारसमोर अर्थव्यवस्थेचा मोठा कठीण काळ होता

  • शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळेल

  • राज्य सरकारच्या सर्वच विभागांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे

  • पुढचे तीन वर्षेही सरकार चांगले चालेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT