महाराष्ट्र बातम्या

एसटी चालकांनो, `त्या` वेळी मोबाईल वापरल्यास खबरदार! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी बस चालवताना चालक मोबाईलवरून बोलत असल्याचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने यापूर्वीच बस चालक-वाहकांना मोबाईलबंदी केली असली, तरी त्याचे प्रमाण कमी झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाने चालक-वाहकांना मोबाईलबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. 

एसटी महामंडळातील चालक-वाहक प्रवासादरम्यान सर्रास मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अनेकदा एसटी चालक बस चालवताना मोबाईलवर बोलत असल्याने अपघात घडले आहेत. अशा बेफिकीर चालकांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे 1 ते 6 जानेवारीदरम्यान विशेष तपासणी करून मोबाईल सापडलेल्या दोषी चालक-वाहकांवर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे वाहतूक उपमहाव्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिले आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या या आदेशावर समाज माध्यमांवरून टीका केली आहे. मोबाईलबंदी आवश्‍यक आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू होणार आहे; मात्र वाहतूक विभागाने काढलेल्या अन्य परिपत्रकांचीही तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी केली जात आहे. 

यांचेही पालन आवश्‍यक 
बसगाड्यांना एका तासापेक्षा अधिक उशीर होऊ नये, हॉर्न, इंडिकेटर, ब्रेक लाईट, सीट बेल्ट, स्वच्छता, वायपर, दोरखंड, ताडपत्री, हत्यारे, प्रथमोपचार पेटी, वाहकाकडील चार्ट, वेळेच्या अर्धा तास आधी चालकाला गाडी देणे, इशू व स्टार्ट पद्धतीचा वापर, पुढील टायर नवीन असणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न घेणे असे वाहतूक विभागाचे आदेश आहेत. या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी समाज माध्यमांवर केली जात आहे. 

कर्तव्यावर असताना कर्मचारी मोबाईलचा वापर करत नाहीत. घरापासून दूर राहून काम करत असताना त्यांना संपर्कासाठी तसेच बस ब्रेकडाऊन झाल्यावर मोबाईलची आवश्‍यकता असते. कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य मोबाईल वापरावर बंदी घालत असताना उत्पन्नवाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; अनेक कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT