महाराष्ट्र बातम्या

Sanjay Rathod : चित्रा वाघांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा...

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Rathod : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना संधी देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राठोड यांच्या शपथविधीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांकडून सरकावर टीकेची झोड उठवली जात असताना आता या सर्व घडामोडींमध्ये बंजारासमाजाने उडी घेतली आहे. त्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा न्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही असा इशाराही बंजारा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. राठोड यांच्यावर वेळोवेळी करण्यात येणाऱ्या टीकेनंतर बंजारा समाजाने आता याप्रकरणी विरोधी भूमिका घेतली असून, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला असून, राठोडांवर केली जाणारी टीका देशातील सबंध बंजारा समाजावर केली जात आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या महंतांनी नाराजीचा सूर आळवला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढं असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता या नाराजी नाट्यात बंजारा समाजानेदेखील उडी घेतली आहे. त्यामुळे आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! निवडणूक आयुक्तांबाबतच्या कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाची नोटीस, मागितलं उत्तर

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी; विराट, शिखर, शुभमन यांचे विक्रम तुटणे निश्चित

Labor Law Changes: Layoff झाला तरी खात्यात पैसे येणार? ‘पुनर्कौशल्य निधी’मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल

Mohol Politics: स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक; उपनगराध्यपदाची लॉटरी कोणाला लागणार? मोहोळकरांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT