prakash aawade sakal
महाराष्ट्र बातम्या

आवाडे यांना हव्यात दोन जागा; पाटील ,कोरेंशी चर्चेनंतर निर्णय

जिल्हा बँकेत महाविकास आघाडीसोबत; प्रकाश आवाडे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik)यांना पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात महाविकास आघाडीसोबत राहण्याचे मान्य केल्याचे समजते. तथापि किमान दोन जागा आपल्याला मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी आज आमदार पी. एन. पाटील व डॉ. विनय कोरे (P.N.Patil, Vinay Kore)यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही निवडणूक बिनविरोध कशी करता येईल याबाबत अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, पी. एन, श्री. कोरे व खासदार संजय मंडलिक यांची बैठक जिल्हा बँकेत झाली होती. तीत आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पी.एन.-कोरे यांच्यावर सोपवली होती. काल (ता. २) आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने न झालेली ही बैठक आज पी. एन. यांच्या निवासस्थानी सायंकाळी झाली.

विकास संस्था गटातील किमान चार ते पाच तालुक्यात लढतीचे चित्र आहे. ज्याठिकाणी तुल्यबळ लढत नाही अशा तालुक्यात इतरांचे अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली. बँकेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसोबत राहू असे आश्‍वासन आवाडे यांनी या बैठकीत दिले. विद्यमान संचालक मंडळाक इतर मागासवर्गीय गटातून आवाडे यांचे संचालक म्हणून विलास गाताडे कार्यरत आहेत. स्वतः आवाडे हेही पुन्हा बँकेत येण्यासाठी इच्छुक आहेत. गाताडे यांच्या जागेसह आणखी किमान एक जागा आपल्याला मिळावी अशी अपेक्षा या बैठकीत आवाडे यांनी व्यक्त केल्याचे समजते. यावर आताच काय शब्द देता येणार नाही अशी भुमिका कोरे-पी. एन. यांनी घेतली. अर्ज छाननीनंतर होणाऱ्या व्यापक बैठकीत यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन या दोघांनी आवाडे यांना दिले.

सोमवारी महाडीक यांच्याशी चर्चा

या बैठकीनंतर आता पी. एन.-कोरे यांच्यावर माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्याशीही चर्चा करण्याची जबाबदारी आहे. ही चर्चा सोमवारी (ता. ६) होणार आहे. या बैठकीचे ठिकाण ठरलेले नाही.

चर्चा सकारात्मक - कोरे

जिल्हा बँक ही जिल्ह्यातील महत्त्वाची अर्थिक संस्था आहे, ही बँक शेतकऱ्यांची आहे. ती राजकारण विरहीत रहावी या उद्देशाने आवाडे, महाडीक यांच्याशी चर्चा करणार होतो. आज आवाडेंशी सकारात्मक चर्चा झाली, त्यांनी आघाडीसोबत रहाण्याचे मान्य केले आहे. सोमवारी महाडीक यांच्याशी बोलणार आहे. जागा वाटपाचा तिढा मंगळवारी (ता. ७) होणाऱ्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत सोडवला जाईल, असे कोरे यांनी बैठकीनंतर ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

आवाडे आघाडीसोबत-पी. एन.

विधान परिषदेत भाजपसोबत असलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा बँकेत आघाडी सोबत रहाण्याचे मान्य केले आहे. त्यांच्यासह इतर गटांच्या जागा वाटपाचा प्रश्‍नांवर नंतर चर्चा केली जाईल, अशी माहिती पी. एन. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

SCROLL FOR NEXT