Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'गडी एकटा निघाला...83 वर्षाचा योद्धा...', अजित पवारांच्या वाटेत शरद पवारांचे बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आलेत आहेत. (Latest Marathi News)

अशातच राज्यात काही ठिकाणी शरद पवार यांना पाठिंबा देणारे पोस्टर लागलेत तर काही ठिकाणी अजित पवार यांना पाठिंबा देणारे पोस्टर झळकले आहेत. तर आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीच्या दोन गटाची कुणाकडे किती आमदार आहेत हे स्पष्ट होईल. मात्र त्या अगोदर सिल्वर ओकसमोर बॅनर लावण्यात आले आहेत. 'गडी एकटा निघाला... 83 वर्षाचा योद्धा..' असे बॅनर सिल्वर ओक परिसरात लागले आहेत.(Latest Marathi News)

सिल्वर ओक परिसरासह शरद पवार ज्या मार्गाने वाय. बी. चव्हाण येथे जाणार आहेत. त्या संपूर्ण मार्गावर अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. तर अजित पवार यांच्या मार्गावर शरद पवार समर्थकांचे बॅनर लागले आहेत.(Latest Marathi News)

मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच गोंधळात सापडलेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.(Latest Marathi News)

आज होणाऱ्या या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृत पत्र जारी केलंय. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ शेअर करून सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनीही आज सर्व आमदारांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT