Shivsena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : 'मातोश्री हीच...' निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मातोश्रीच्या बाहेर झळकले बॅनर

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानाच्या गेटवर कार्यकर्त्यांची भेट घेतली

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यामुळे ठाकरे गटासह राज्याला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर काल सकाळपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

Banner

या जमलेल्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे भेटले. उद्धव ठाकरे यांनी ओपन जीपमधून त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी काही कार्यकर्ते पुण्याहून आले होते. या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे.

युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्रीबाहेर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर “काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत”, अशा आशयाचं पोस्टर मातोश्रीबाहेर झळकलं आहे. मातोश्रीबाहेर पुण्यातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलीय. ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते.

त्याचबरोबर आणखी काही बॅनरमध्ये एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावर “ठाकरे परिवार आणि असंख्य शिवसैनिक हेच आमचे पंढरपूर आणि मातोश्री हीच आमची चंद्रभागा, उद्धव साहेब हेच आमचे विठ्ठल”, असं बॅनरवर लिहण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT