Ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : चाळीस आमदारांना खूष करायला वाट्टेल ते सुरु आहे

केवळ चाळीस आमदारांना खुष ठेवण्यासाठी आज राज्यकर्ते वाट्टेल ते करीत आहेत, त्यांनी मागणी केलेल्या कामांना पंचवीस पंधराची कामे, तीस चोपन्नची कामे मंजूर केली जात आहेत.

मिलिंद संगई,

बारामती - केवळ चाळीस आमदारांना खुष ठेवण्यासाठी आज राज्यकर्ते वाट्टेल ते करीत आहेत, त्यांनी मागणी केलेल्या कामांना पंचवीस पंधराची कामे, तीस चोपन्नची कामे मंजूर केली जात आहेत, अधिकारी सांगतात याला निधी नाही, अर्थसंकल्पात तरतूद नाही, तरीही ही कामे मंजूर करायचा धडाकाच सुरु आहे कारण तो आमदार नाराज होता कामा नये....अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार आर्थिक शिस्त पाळत नसल्याचा घणाघाती आरोप केला. बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी ही टीका केली.

अजित पवार म्हणाले, मीही अनेक वर्षे अर्थमंत्री म्हणून काम केले आहे, बँकींग क्षेत्राशी माझा निकटचा संबंध आहे, आर्थिक शिस्त ही पाळावीच लागते, पण सरकार आमदार नाराज झाले तर वरिष्ठांच्या खुर्चीवर त्याचा परिणाम होईल या भीतीपोटी शिस्त पाळत नाही. याचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. किती जणांना कामे केल्यानंतर बिले मिळणार आहेत या बद्दल मी स्वताः साशंक आहे, कामे मिळविण्यासाठी वेडेवाकडे प्रकार घडतात, दलाल फिरत आहेत, बदल्यांमध्येही तोच घोळ सुरु आहे. राज्याचे पुढे काय होणार याबद्दल राज्यकर्त्यांना काही देणे घेणे नाही.

सहाशे रुपये दराने वाळूचा मुद्दा मध्येच काढला गेला. ब्रम्हदेव आला तरी आता या दराने वाळू मिळू शकत नाही हे मलाही समजते आहे. महागाई वाढते आहे, राज्य कर्जबाजारी होत चालले आहे, या बाबतचे नियोजनच ढासळले आहे. मध्यंतरी मला काही अधिका-यांनी सांगितले, अर्थसंकल्पात जितकी तरतूद आहे त्यांच्या दहा पट जास्तीची कामे काढली जात आहेत.

दहा वर्ष बिले मिळणार नाहीत अशी स्थिती आहे. निवडणूकीपुरती वेळ मारुन नेण्याचा विचार करणारे राज्यकर्ते राज्यात आहेत, त्याची जबरदस्त किंमत राज्याला मोजावी लागत आहे.

महागाई, बेरोजगारी व राज्याच्या महत्वाच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी, ती होत नाही ही बाब योग्य नाही. हे काय म्हणाले त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रीया हेच सुरु राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT