Baramati crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati crime: बारामती हादरली! भावानेच केली भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या

रुपेश नामदास

बारामती तालुक्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. मागील आठवड्यात गोळीबारीची घटना घडल्यानंतर आता जमिनीच्या वादातून एक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

बारामती तालुक्यातील सांगवी या गावात बुधवारी सकाळी चुलत भावानेच भावाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. आरोपी विशाल फडतरे याने ही हत्या केली आहे. विनोद हिराचंद फडतरे आणि विशाल फडतरे हे चुलत भाऊ होते. यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी विशाल फडतरे याने विनोद फडतरे याची हत्या केली. विनोद फडतरे हा आज सकाळी सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात दुचाकीवरून गेला होता. या ठिकाणी त्याचा चुलत भाऊ विशाल फडतरे हा देखील होता.

जमिनीच्या वादातून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर विशालने विनोदला दुचाकीवरून खाली पाडले आणि डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीत तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरी, वाहनचोरी,हत्या, खंडणी अशा घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढत असल्यामुळे प्रशासनाचा धाक कमी झाला आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT