ATS Squad

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

बार्शीच्या सामाजिक संस्थेचा पाकिस्तानशी संबंध! विनापरवाना संस्था काढून जमविले १०.२६ कोटी; गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्काचा संशय; ‘एटीएस’ने आणखी एकाला उचलले

मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बार्शीतील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकजण अटकेत आहे. फरार असलेल्या दोघांपैकी एकाला आज (मंगळवारी) ‘एटीएस’च्या पथकाने पकडून मुंबईला नेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बार्शीतील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकजण अटकेत आहे. फरार असलेल्या दोघांपैकी एकाला आज (मंगळवारी) ‘एटीएस’च्या पथकाने पकडून मुंबईला नेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. फरार असलेला एक आणि अटकेतील दोघेही पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय असून, त्या दृष्टीने सध्या तपास सुरू आहे.

बार्शीतील सामाजिक संस्था स्थापन झाल्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका संस्थेने आठ लाख रुपयांची मदत केली होती. या अनुषंगाने ‘एटीएस’ने त्या आंतरराष्ट्रीय संस्थेची १५ बँक खाती तपासली. त्यामध्ये, या संस्थेने काही वर्षांत तब्बल १२६ कोटी रुपये उभारल्याचे समोर आले. त्या संस्थेकडे पाकिस्तानातील ७० हून अधिक नागरिकांचे मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सॲप ग्रुप आढळले.

तसेच, बार्शीतील संस्थेच्या ज्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली, त्याच्या मोबाईलमध्येही पाकिस्तानातील सुमारे ५० जणांचे मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सॲप ग्रुप आढळले. दरम्यान, ‘एटीएस’च्या कारवाईचा सुगावा लागताच इतर सहकाऱ्यांनी संस्थेच्या संगणकावरील माहितीच नष्ट केली. या प्रकरणातील फरार दोघांनी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

बनावट नोंदणीद्वारे जमविले सव्वादहा कोटी

बार्शीतील काही व्यक्तींनी दोन वर्षांपूर्वी एक सामाजिक संस्था स्थापन केली. मात्र, त्यांनी संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे न करता सेल डीड करून त्यावरील क्रमांक देणगी गोळा करताना वापरला. संस्थेला मिळालेल्या देणगीचा हिशेब ते संगणकात ठेवत होते. दोन वर्षांत त्यांनी सव्वादहा कोटी रुपयांची देणगी जमा केली. या रकमेचा वापर नेमका कोठे आणि कशासाठी करण्यात आला, याचा सखोल तपास सुरू आहे.

देणगी घेतली; मात्र सामाजिक कामेच केली नाहीत

‘आम्ही संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करतो. आमची संस्था नोंदणीकृत आहे. लोकांनी संस्थेला स्वखुशीने देणगी दिली असून, कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्या पैशातून आम्ही सामाजिक कामे करतो,’ असा युक्तिवाद संशयितांतर्फे न्यायालयात करण्यात आला. त्यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी नसल्याचे पत्र सादर केले. तसेच, संस्थेने केलेल्या सामाजिक कामांची माहिती सादर करण्यास सांगितले; मात्र संशयितांच्या वतीने त्याबाबत कोणतीही माहिती देता आली नाही. त्यावर ॲड. राजपूत यांनी, ‘हे पैसे देशविघातक कृत्यांसाठी वापरण्यात आले की वापरण्याचा त्यांचा हेतू होता?’ असा प्रश्न उपस्थित करीत संशयितांच्या जामिनास हरकत घेतली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले.

गँगस्टर शहजाद भट्टी कोण आहे?

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, तो दुबईहून गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्क चालवतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो भारतीय तरुणांना सहज आपल्या जाळ्यात ओढतो. पैशांचे आमिष आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे प्रलोभन दाखवून तो तरुणांमध्ये ऑनलाइन कट्टरतावाद पसरवतो. तसेच, भारतात अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याबरोबरच देशविघातक कारवायांचे नियोजनही करतो. भट्टीचे भारतीय गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याच्याशीही संबंध असल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT