महाराष्ट्र बातम्या

Video Viral : पोलिसांनी आरोपीची भर पावसात काढली धिंड; हॉटेल मॅनेजरला मारहाण केल्याचं प्रकरण, व्हिडीओ पाहा

Barshi cctv : या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची भर पावसात धिंड काढण्यात आलेली आहे. आरोपींना कोर्टात दाखल करण्यासाठी नेत असताना बार्शी शहरातील पांडे चौक ते कोर्टापर्यंत त्यांची भर पावसात धिंड काढण्यात आली. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

संतोष कानडे

मुंबईः बार्शीतल्या एका हॉटेलमध्ये दारुच्या पैशांवरुन मॅनेजरला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. आता पोलिसांनी बार्शीतल्या त्या आरोपींना पकडून भर पावसात त्यांची धिंड काढली आहे. त्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

बार्शीतील एका हॉटेलमध्ये दारूचे पैसे न देता हॉटेल मॅनेजरला मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मारहाण करणाऱ्या आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १०९(१),११५(२),३२४(४), ३०८(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची भर पावसात धिंड काढण्यात आलेली आहे. आरोपींना कोर्टात दाखल करण्यासाठी नेत असताना बार्शी शहरातील पांडे चौक ते कोर्टापर्यंत त्यांची भर पावसात धिंड काढण्यात आली. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकी घटना काय?

सोलापूरमधील बार्शी तालुक्यात मंगळवारी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून दारुड्यांनी बिलावरून वाद घालत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली. या मारहाणीत हॉटेल मॅनेजर महेश अंधारे जखमी झाला आहे.

बिलाच्या वादातून हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात बाटल्या फोडत जबर मारहाण केली. त्यानंतर इतर दारुडेही मारहाण करायला लागले. सर्वांनी मिळून मॅनेजरला लाथाबुक्यांनी तुडवले. या प्रकरणी पोलिसांनी ४ दारुड्यांवर गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून टाकला नवा बॉम्ब ! २२ वेळा मतदान, कोण आहे ती? सीमा, स्विटी, सरस्वती...;

Women's World Cup : कर्णधाराने ज्युनियर खेळाडूला कानाखाली खेचली... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूसोबत गैरवर्तवणुक, बोर्डाने दिली प्रतिक्रिया

Katraj Tunnel : कात्रज बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला; प्रशासनाच्या निर्णयावर नागरिक संतप्त

Nashik News : नाशिक विकासकामांना 'ब्रेक'; पालकमंत्र्यांअभावी १० महिने थांबलेली कामे आता आचारसंहितेच्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

SCROLL FOR NEXT