Barsu Refinery protest  
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery protest : अश्रुधुरामुळं श्वास कोंडला...आम्ही काय करायचं; आंदोलकांचा संतप्त सवाल

डोकं फुटलं तरी चालेल. आम्ही त्यांना जमीन देणार नाही.

धनश्री ओतारी

 बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद चागंलाच चिघळला आहे.  आंदोलकांनी रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहे. डोकं फुटलं तरी चालेल. आम्ही त्यांना काही देणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी घेतली आहे. (Barsu Refinery Latest Update Suffocated by tear gas )

आंदोलकांना थांबवण्यात आलं आहे पण हे आंदोलक जाण्यासाठी तयार नाहीत. कडक्याचं उन आहे. अनेकांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. काही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे अनेकजण बेशुद्ध पडले आहेत.

रिफायनरी विरोधातील आंदोलनावर सध्या विरोधक ठाम आहेत. आज या माती परीक्षणाला जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे टाकल्याचा चित्र उभे राहिलं आहे.

स्थानिकांचे संतप्त सवाल?

काय झालय ते बघा. हा धूर फेकल्यामुळे अनेजण बेशुद्ध पडले आहेत. चक्कर आली आहे. इथे कोणती सोय नाही. डॉक्टर नाही. आम्ही काय करायचं ते पहिला सांगा.

आमच्यावर लाठीहल्ला केला. धूर सोडल्यामुळे लोकांना त्रास झाला आहे. आम्ही काय चोरी करण्यासाठी इथे आलो आहे का? असा सवाल एका आंदोलकाने उपस्थित केला आहे.

४०० पेक्षा अधिक लोक आहेत. यामध्ये अधिक महिला आहेत. शांतेत सर्वांशी संवाद साधा. लोकांचा अंत पाहू नका. आमच्या जमिनी आम्ही कोणाला ही घेऊ देणार नाही.

मारलं तरी आम्ही मागे हटणार नाही. ७-८ बायकांना मारलं. आम्ही इथून हालणार नाही. डोकं फुटलं तरी चालेल. आम्ही त्यांना काही देणार नाही. आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार. अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याला विरोध करत स्थानिकांनी आपलं आंदोलन तीव्र केलं. हे सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी गावकरी विरोध करत आहेत. आंदोलनस्थळावर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

Maharashtra Fisheries : पर्ससीन, एलईडी मासेमारीची एसआयटीमार्फत चौकशी करा; पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीची मागणी!

Pune News : महापालिकेने केली इमारत पाडकामासाठी नियमावली

SCROLL FOR NEXT