Barsu Refinery movement  
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery: बारसू रिफायनरी आंदोलन पेटलं! आंदोलनस्थळी पोलिसांची वाट अडवणाऱ्या २५ महिलांना अटक

रवींद्र देशमुख

मुंबई - कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलन आता तीव्र स्वरुपात करण्यात येत आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

मात्र स्थानिक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनस्थळावरून हटणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर २५ आंदोलक महिलांना अटक कऱण्यात आली आहे. (Refinery Survey second day vaibhav kolvankar arrested) (Latest Marathi News)

आमच्या जमिनी आम्ही कोणालाही देणार नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी आंदोलकांना आणि माध्यम प्रतिनिधींना देखील आंदोलनस्थळावरून बाजुला होण्याचे निर्देश देण्यात आले असून या भागात कलम १४४ लावण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. तसेच २५ आंदोलक महिलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी महिती दिली आहे.

या भागातील ग्रामस्थांना सातत्याने रस्त्यावरून बाजुला जाण्यास सांगितलं आहे. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असून कोणताही नेता अद्याप आंदोलनस्थळी कोणाही पोहोचलेलं नाही. समाज माध्यमांवर नेत्यांकडून प्रतिक्रिया देत असून अद्याप कोणीही आंदोलनस्थळी पोहोलचले नाही.

आजपासून रिफायनरीच्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. याआधी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यासोबत इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT