ज्ञानोबा काळे, संग्रहित छायाचित्र
ज्ञानोबा काळे, संग्रहित छायाचित्र e sakal
महाराष्ट्र

कोरोनाने हिरावले मित्राला, बॅचमेट्‍सनी सावरले कुटुंबाला

अनिल कांबळे

नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलिस दलात (maharashtra state police force) असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) कोरोनाने (coronavirus) निधन झाल्याने त्याचा संसार उघड्यावर पडला. मात्र ‘पीएसआय डीएन १११’ बॅचच्या पोलिस उपनिरीक्षकांनी आपल्या बॅचमेटच्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी घेऊन मैत्रीचे कर्तव्य पार पाडले. एवढेच नव्हे तर २० लाख रुपयांची मदतही दिली. (batchmates help to family of corona deceased PSI dyanoba kale)

नागपुरातील ३७ अधिकाऱ्यांसह राज्यातील ६५० उपनिरीक्षकांनी दोन दिवसांत २० लाख रूपये गोळा करीत सहकाऱ्याच्या कुटुंबाला आधार दिला. यामुळे खाकीतील माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा या खेडेगावातील युवक ज्ञानोबा शिवाजी काळे बारावी होताच राज्य राखीव पोलिस दलात भरती झाले. २०१३ ला झालेल्या एमपीएससी परीक्षेत ज्ञानोबा काळे उत्तीर्ण झाले. पीएसआय डीएन १११ बॅचला त्यांनी ६५० अधिकाऱ्यांसह प्रशिक्षण घेतले. नांदेड जिल्ह्यात ते नोकरी बजावत होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची बाधा झाली. ज्ञानोबा यांना वाचविण्यासाठी परंडा येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली. ज्ञानोबा गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पीएसआय ज्ञानोबा काळे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा मॅसेज ‘पीएसआय बॅच १११’ या व्हॉट्सॲप ग्रूपवर आला. राज्यभरातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत ६५० अधिकाऱ्यांच्या मनात धस्स झाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानोबा यांच्या पश्चात पत्नी मीरा, १३ वर्षाची मुलगी संचिता आणि सात वर्षाचा मुलगा सार्थक आणि वृद्ध आई वडील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याचा विचार नागपुरातील एका महिला पीएसआयने मांडला. त्यावर सर्वांनीच होकार दिला आणि कामाला सुरुवात केली. अवघ्या दोन दिवसांत २० लाख रुपयांची रक्कम जमा झाली. तसेच दोन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे ठरविले आहे. खाकीतील जिवंत असलेल्या माणुसकीने एका बॅचमेटचे कुटुंब सावरले.

बँकेत करणार ‘एफडी’

ज्ञानोबा काळे यांच्यासाठी जमा झालेली २० लाखांची रक्कम त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे बॅंकेत ‘फिक्स डिपॉझिट’ करण्यात येणार आहेत. या रकमेमुळे मुलांचे भविष्य तसेच कुटुंबाला थोडाफार आधार मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT