bats 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात 'निपाह', महाबळेश्वरमध्ये वटवाघळात आढळला विषाणू

कार्तिक पुजारी

पुणे- जिवघेणा निपाह विषाणू महाराष्ट्रातील दोन वटवाघुळात आढळून आला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्ववर येथील गुहेतील दोन वटवाघुळात निपाह विषाणू सापडला आहे. अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रग्या यादव यांना सांगितलं की, महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता. पण, मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो.

निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एनआयएने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 1 ते 2 टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 65 ते 100 टक्के असते. त्यामुळेच या विषाणूचा धोका जास्त आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार वटवाघळाच्या माध्यमातूनच झाल्याचं सांगितलं जातं. शिवाय इबोलाचा प्रसार वटवाघळातूनच झाला होता. महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या संकटाशी लढा देत आहे. त्यातच आता निपाह विषाणूच्या बातमीने राज्याच्या चिंतेत भर पडणार आहे. 2018 मध्ये केरळ राज्यात निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय राज्याच्या सीमा केरळमधील लोकांसाठी बंद कराव्या लागल्या होत्या. केरळमध्ये निपाह विषाणूने आपले भयानक रुप दाखवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT