nitesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

पालिका निवडणुकीपूर्वी हिंदुत्व कार्ड जोरात! नितेश राणेंचीही उडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पालिका निवडणुकीच्या (muncipal election) तोंडावर मुंबईमध्ये हिंदुत्वाच्या मुद्याने डोके वर काढले असून, आता मनसे (MNS) पाठोपाठ भाजप (BJP) देखील आघाडीवर आहे. मुंबईतील हिंदूंच्या (HINDU) रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे ट्विट आज नितेश राणे (Nitesh rane) यांनी केले आहे.

ट्विटमध्ये नितेश राणे काय म्हणालेत

बांगलादेशात नुकतेच नवरात्रीच्या काळात थेट दुर्गा देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. मंदिराची तोडफोड करण्यात आली. मंदिरातील पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेच मुसलमानांनी येथील हिंदूंच्या वस्तीवर हल्ला केला. त्यामुळे येथे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा संदर्भ देत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले. जे बांगलादेशात घडले तेच पुढे मुंबईत घडणार आहे. त्यातील मालवणी हा सध्याचा पहिला भाग आहे. अशा प्रकारे मुंबईत अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देणार आहोत, तेथील हिंदूंना पाठिंबा देणार आहोत. येत्या आठवड्यात आम्ही हे कार्य सुरु करणार आहोत.तसेच बंगाल पॅटर्नवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम आणि उघडकीस आणणार आहोत असे देखील ते म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण आणि त्यानंतर भाजपा नेत्यांकडून (bjp) आलेल्या प्रतिक्रियांचा समाचार 'सामना' च्या अग्रलेखातून शिवसेनेनं घेतल्यानंतर भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनीही संजय राऊतांवर (sanjay raut) ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

नितेश राणे ट्विट

‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्वीट करत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मास्टरस्ट्रोक, मोदी सरकारने का घेतला मोठा निर्णय? Inside Story

India vs Sri Lanka Tests: श्रीलंकेतील कसोटीपूर्वी बुमराच्या तंदुरुस्तीवर लक्ष

पेपरफुटीचा मास्टरमाइंड अटकेत! महिनाभर गुंगारा देणारे २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; TET पेपरफुटी प्रकरणातील मोठं नेटवर्क एक्सपोज

Latest Marathi News Update : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दी

Tembhu Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! टेंभूला ६९१ कोटी, म्हैसाळ-ताकारीला ९१९ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT