Temperature  sakal
महाराष्ट्र बातम्या

काळजी घ्या! मार्चच्या सुरवातीलाच सोलापुरात उन्हाचा पारा ३७.२ अंशावर; पुढील ६ दिवस तापमान ३८ अंशावर; लहान मुले, वृद्धांची काळजी घ्या, वाचा...

यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद आज झाली. सोलापूर शहर व जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी कडाक्याचे उन पडले होते. मार्च महिन्यात यंदा कडाक्याचे उन असणार, याची चुणूकच आजच्या तापमानाने दाखवून दिली आहे. शनिवारी सोलापुरात ३६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. आज तापमानाचा पारा ३७.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद आज झाली. सोलापूर शहर व जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी कडाक्याचे उन पडले होते. मार्च महिन्यात यंदा कडाक्याचे उन असणार, याची चुणूकच आजच्या तापमानाने दाखवून दिली आहे. शनिवारी सोलापुरात ३६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. आज तापमानाचा पारा ३७.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. एकाच दिवसात ०.७ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.

सोलापूरच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उकाडा वाढला आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे. दुपारच्या सुमारास अनेक जण घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी पांढरे कपडे, टोपी, गमजाचा वापर सुरू झाला आहे. उन्हाचा चटका वाढू लागल्याने आईसक्रिम, थंडपेये याची दुकाने थाटू लागली आहेत. सोलापूरच्या वातावरणात कमाल व किमान तापमानात चढ उतार होत आहे. त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे. सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, खोकला यासह इतर विकार अनेकांना उदभवू लागले आहेत.

तापमानाचा पारा वाढल्यानंतर अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता वाढलेल्या तापमानामुळे येत्या काळात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. सध्या द्राक्ष आणि आंबा ही फळपिके जोमात आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणा परिणाम या फळबागांवर होण्याची शक्यता आहे. या शिवाय रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके काढणीच्या स्थितीत आहेत. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास पिकांचे व फळबागांचे मोठे नूकसान होणार आहे.

मार्चमध्ये पाऊस अन्‌ उच्चांकी तापमानाचा विक्रम

सोलापूर जिल्ह्यात मार्च महिन्याने तुफान पाऊस आणि कडक उन अशी दोन्ही रुपे यापूर्वी दाखविली आहेत. मार्चमध्ये सोलापूरात सरासरी ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान राहते. मार्च महिन्यात सर्वाधिक ४३.९ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची नोंद २८ मार्च १८९२ रोजी झालेली आहे. मार्चमधील उच्चांकी तापमानाचा हा विक्रम १३३ वर्षानंतरही आजही कायम आहे. मार्च महिन्यात तापमानाचा पारा भडकल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याच्याही नोंदी आहेत. मार्च महिन्यात सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याच्या नोंदी सातत्याने आढळतात. मार्चमध्ये एका दिवसात सर्वाधिक ४३ मिली मीटर पावसाची नोंद २७ मार्च १९८९ रोजी झालेली आहे.

पुढील सहा दिवसातील कमाल तापमान, अंश सेल्सिअसमध्ये

  • ता. २ मार्च : ३८.०

  • ता. ३ मार्च : ३८.०

  • ता. ४ मार्च : ३७.०

  • ता. ५ मार्च : ३६.०

  • ता. ६ मार्च : ३७.०

  • ता. ७ मार्च : ३८.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT