file 
महाराष्ट्र बातम्या

भानामतीच्या संशयावरुन अमानुष कृत्य; भरचौकात हातपाय बांधून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र तेलंगाना सिमेवर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भानामती केल्याच्या संशयातून सात जणांना संपूर्ण गावकऱ्यांनी भरचौकात बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयावरुन खांबाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी घडली. वृद्ध, महिला, लहान बाळ कोणाचाही विचार न करता बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूरला हलवण्यात आलेले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कुणावर केला, हे सांगण्यास नकार दिला.

वणी या गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांचा चोख बंदोबस्तही आहे. बाहेरील कुणालाही गावात येऊ दिले जात नाही. दरम्यान या घटनेला अनेक पदर असल्याचं सागंण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी ही घटना असतानाही या प्रकरणाबाबत पोलीस मात्र अतिशय गोपनीयता बाळगत असल्याचे दिसून येते.

मारहाण झालेले कुटुंब मागील काही वर्षांपासून जादूटोणा करत असल्याचा संशय गावातील लोकांना होता. त्यामुळे कुटुंबाला तेलंगणा येथे पाठवण्यात आलं होतं. पण मेहरमच्या आसपास हे कुटुंब पुन्हा गावात परतले. या कुटुंबाने पुन्हा जादूटोणा करण्यास सुरूवात केल्याचा संशय आला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या कुटुंबाला होणाऱ्या अमानुष मारहाणीच्या घटनेची माहिती एका अज्ञाताने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT