Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''तुमचा फोटो लावणार, ताकद असेल तर काढून दाखवा'', अमरसिंह पंडितांचं शरद पवारांना उलट उत्तर

संतोष कानडे

बीडः बीडमध्ये आज अजित पवार गटाची सभा होत आहे. या सभेसाठी हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, अमरसिंह पंडित यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी अमरसिंह पंडितांनी थेट शरद पवारांनाच उलट उत्तर दिलं.

बीडमध्ये शरद पवारांची १७ तारखेला सभा झाली होती. या सभेत शरद पवारांनी अमरसिंह पंडित यांचं नाव घेऊन टीका केली होती. ''अमरसिंह पंडित म्हणतात, शरद पवारांचं वय झालं त्यांच्याकडून आता काय होणार. त्यामुळे मी त्यांना सोडलं. ज्यांना सोडलं त्यांनी निदान वरिष्ठांकडून काही शिकायला मिळालं असेल त्याची जाण ठेवावी'' असं शरद पवार म्हणाले होते. यासह अजित पवार गटाने फोटो वापरु नये, असंही नंतर शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं होतं.

आज बीडच्या सभेत गेवराई विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि शरद पवारांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांना उत्तर दिलं. पण ते प्रेमाचं उत्तर होतं. अमरसिंह पंडित म्हणाले की, तुम्ही म्हणता माझे फोटो लावू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करु. पण मी म्हणतो शिवछत्रच्या देवघरामध्ये, पंडित कुटुंबाच्या देवघरामध्ये तुमचा फोटो आहे. तो जावून काढा.. पाहू तुमच्यात किती ताकद आहे ती.

पंडित पुढे म्हणाले की, साहेब आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम केलं. पण मी तुम्हाला विश्वास देता यानंतर निवडणुकांमध्ये नाही लावणार फोटो पण तुमचे संस्कार आमच्या मनातून काढाल का? तुमच्याच संस्काराने आम्ही पुढची लढाई लढू,असं अमरसिंह पंडित म्हणाले.

दरम्यान, पवारांचं वय झालं.. म्हणून अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या पवारांच्या आक्षेपावर अमरसिंह पंडित म्हणाले की, जे मी बोलले ते तुमच्यादेखत बोललो, तुमच्या काळजीने बोललो.. तुमच्यामागे मी कधीही बोललो नाही. या वयात एवढं फिरणं बरं नाही, असं म्हणालो. त्यामुळे आपल्यावर आरोप करु नयेत, असं पंडितांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT