Beed Audio Clip esakal
महाराष्ट्र बातम्या

Beed Audio Clip : धनंजय मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान; बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

दरम्यान, आज त्यांच्याच पक्षातील शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष माऊली खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कुंडलिक खांडेंना अटक झाली आहे. यानंतर आता पक्षाने त्यांची हाकालपट्टी केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत बंजरंग सोनावणे यांचे काम करत पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे, तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याबाबत वक्तव्य केले होते.

संतोष कानडे

बीडः राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याची आणि त्यांना मारहाण करण्याची भाषा शिवसेना जिल्हाप्रमुखाला भोवली आहे. शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी तसं पत्र देखील काढलं आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप चार दिवसांपूर्वी वायरल झाली होती. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली, असं संभाषण आहे. त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडेंवरदेखील हल्ला करणार असल्याचं संभाषण आहे.

दरम्यान, आज त्यांच्याच पक्षातील शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष माऊली खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कुंडलिक खांडेंना अटक झाली आहे. यानंतर आता पक्षाने त्यांची हाकालपट्टी केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत बंजरंग सोनावणे यांचे काम करत पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे, तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याबाबत वक्तव्य केले होते.

या सर्व प्रकरणानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे नेते वाल्मिक कराड यांनी परळी पोलिसांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख खांडे आणि शिवराज बांगर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. खांडे यांच्या शोधासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांचं पथक रवाना झालं होतं. कुंडलिक खांडे हे जामखेडमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Former Army kill : पत्नी, दोन मुलांनी मिळून केला माजी सैनिकाचा खून, कबनूरमध्ये घटना

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

SCROLL FOR NEXT