first Gopinath Munde now Mete in an accident esakal
महाराष्ट्र बातम्या

तेव्हा मुंडे आता मेटे, मराठवाड्याच्या नेत्यांच्या अपघाती मृत्यू मागे संशयाचं धुकं कायम

मेटे यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण बीडकरांनी झाली

धनश्री ओतारी

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या या अपघाती निधनानंतर पुन्हा एकदा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण बीडकरांनी झाली आहे. कारण, मुंडे यांचे निधन अपघातात झाले होते.(beed lost first Gopinath Munde now Mete in an accident)

राज्याच्या राजकारणात बीड जिल्हा नेहमीच केंद्रबिंदू ठरला आहे. बीडची ओळख फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. देशात 2014 साली भाजपची केंद्रात सत्ता आली त्यावेळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन पुन्हा बीडच्या विकासाचा निश्चय करून दिल्लीहून निघालेल्या मुंडे यांचा अपघाती निधन झाले. बीडकरांसाठी हा मोठा धक्का होता.

त्यानंतर आता मेटे

मराठा समाजासाठी रात्रंदिवस झटणारे समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी काय रस्त्यावरची लढाई करणारे नेते म्हणून विनायक मेटे यांची ओळख आहे. राजकारण कळायला सुरूवात झाल्यापासून ते वयाच्या 52 वर्षांपर्यंत संघर्ष करणाऱ्या विनायक मेटे यांचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा प्रवास मोठा होता. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि मराठा समाजाचा बुलंद आवाज थांबला.

अपघात होता की हत्या?

रविवारी मुंबईत अचानक मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक ठरली. त्याचा निरोप आल्याने नियोजित तिरंगा फेरी सोडून मेटे मुंबईकडे रवाना झाले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली.

अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. असा आरोप मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अपघाताबद्दल संशय निर्माण झाला.

त्याचबरोबर हा घात आहे की अपघात अशी शंका पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

3 जून 2014 ला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. मुंडेचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास. पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले.

ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं, त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही, डॉक्टरानी अंतर्गत रक्तस्त्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं. मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळेत लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT