Dhananajay Munde sakal
महाराष्ट्र बातम्या

'ईडी'पेक्षा शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त - धनंजय मुंडे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

तुळजापूर : राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तुळजापूर इथं एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. ईडीच्या कारवायांवर भाष्य करताना ईडीपेक्षा शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त असल्याचं उपहासात्मक विधान त्यांनी केलं. (Beedi cost in farmers pockets more than ED says Dhananjay Munde)

मुंडे म्हणाले, अनेकदा सांगूनही त्यांनी नाद केला आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्यांना वाटलं होतं आपलं होतं त्यांचं कधीच नाही झालं हे त्यांना कळालंच नाही, ४४ आमदारांचे मंत्री झाले. तर १०५ आमदारांचे विरोधीपक्षात बसले. पण भारतीय जनता पार्टीच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं तरी भल्याभल्याच्या मागं इन्कम टॅक्स काय? सीबीआय काय? ईडीची तर एवढीपण इज्जतच ठेवली नाही. त्या ईडीपेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या गणेश बीडीची किंमत जास्त आहे.

राज्याच्या सर्वात मोठ्या संविधानिकपदावर जो व्यक्ती बसतो आज तोच व्यक्ती जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभद्र बोलत असेल तर छत्रपतींच्या लेकरांनी कसं सहन करायचं? याचाही येणाऱ्या काळात आपल्याला विचार करावा लागेल, अशा शब्दांत मुंडेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT