Bee-Attack 
महाराष्ट्र बातम्या

शेतकरी कुटुंबावर मधमाशांच्या हल्ला; एकाचा मृत्यू तीन जण गंभीर जखमी

सकाळवृत्तसेवा

अकोट (अकोला) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक हल्ला चढविला. यामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील तीन जन गंभीर असल्याची घटना तालुक्यातील उमरा शनिवारी (ता.30) सकाळच्या सुमारास घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (52 वर्षे) असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पुजा सुकोसे (2वर्षे) सर्व रा. उमरा हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहा वाजताचे सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले. जेवन सुरू असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले.

चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबियांवर हल्ला चढविला. हा हल्ला एवढा जबर होता की, सर्व जण गंभीर जखमी झाले. मधमाशांचा दंश असह्य झालेले सुकोसे कुटंबियांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांचा पाठलाख करीत राहीले. यावेळी सुनिल वर्तने हे सुकोसे कुटुंबियांच्या मदतीला धावले. जखमी झालेल्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लक्ष्मण सुकोसे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या संतोष, रेखाबाई व पुजा यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीवर उपचार सुरू आहे. मधमाशांनी केलेल्या हल्लामुळे परिसरात खडबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT