drinking 

sakal solapur

महाराष्ट्र बातम्या

३१ डिसेंबर साजरा करण्यापूर्वी नक्की वाचा..! ढाब्यांवरील विनापरवाना मद्यपान पडेल महागात, विनापरवाना मद्यविक्री केल्यास व मद्यपींना किती होईल दंड, वाचा...

वर्षाचा शेवट म्हणजेच ३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आहे. दुसरीकडे, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ढाब्यांवरील पार्टी, अवैध मद्यविक्री, वाहतूक, साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे. ढाब्यांवर कोणी मद्यविक्री करून मद्यपींची सोय करीत असल्यास तो ढाबा मालक आणि मद्यपींवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : वर्षाचा शेवट म्हणजेच ३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आहे. दुसरीकडे, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ढाब्यांवरील पार्टी, अवैध मद्यविक्री, वाहतूक, साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे. ढाब्यांवर कोणी मद्यविक्री करून मद्यपींची सोय करीत असल्यास तो ढाबा मालक आणि मद्यपींवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

परमीट बार वगळता अन्य कोठेही विनापरवाना मद्यविक्री, मद्यपान करता येत नाही. तरीदेखील, राष्ट्रीय महामार्गांवरील अनेक ढाबे, हॉटेलवर मद्यपींची सोय करून दिली जाते. सोलापूर शहरात देखील अनेक बिअर शॉपी, हॉटेलमध्ये देखील असेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित ढाबा, हॉटेल चालक व तेथील मद्यपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होऊ शकते.

दारूबंदी न्यायालयात ढाबा चालकास पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत तर मद्यपीस एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने मद्यपींनी एक रुपयात ऑनलाइन परवाना घ्यावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

सावधान! बनावट ब्रँडची करा खात्री

राज्य उत्पादन शुल्क विभागाने व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी अवैध हातभट्ट्यांवर व दारू विक्रेत्यांवर छापे मारले. त्यावेळी तेथे दारूच्या विविध ब्रँडची हजारो टोपणं आढळली होती. विनाब्रँडच्या बाटल्यांना ती टोपणं लावून जादा किमतीने दारू विक्रीचे प्रकारही समोर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशा बनावट दारूची विक्री होऊ शकते. त्यामुळे मद्यपींनी त्याबद्दलची खात्री करावी आणि तसा प्रकार आढळल्यास थेट राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ क्रमांकावर करावी तक्रार

३१ डिसेंबर आणि निवडणुकीची आचारसंहिता, या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री, परवाना नसताना मद्यविक्री किंवा मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईसाठी पथके वाढविण्यात आली आहेत. अवैध दारूविक्री, वाहतूक, साठ्यासंदर्भात कोणाला माहिती असल्यास त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्‌सॲप क्रमांकांवर द्यावी.

- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

दोन सहकारी अन् मित्राच्या त्रासाला कंटाळून TCS मधील आयटी अभियंत्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटी बस पलटी; प्रवाशांची थरारक सुटका

SCROLL FOR NEXT