NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: "समोरचे लोक ताकद दाखवू शकले नाहीत"; सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा

Sandip Kapde

NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचा युक्तिवाद होणार आहे. आज एक गट आपली बाजू मांडणार आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली.

आज याबाबत सुनावणी होणार आहे. सुनावणीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रफुल पटेल म्हणाले, दोन्ही गटाचे वकील आयोगात आपली बाजू मांडणार आहेत. आम्हाला खात्री आहे की जवळपास संघटनात्मक अधिक लोक आमच्यासोबत आहेत. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसती राष्ट्रीय मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आम्हाला मान्यता प्राप्त आहे. त्या अर्थाने नागालँडमधील ७ आमदार तर महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

इतर संघटनात्मक लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समोरचे लोक काही ताकद दाखवू शकले नाही. तरी हा माझा विषय नाही. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेणार, असे पटेल म्हणाले.

शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहणार आहेत. यावर प्रफुल पटेल म्हणाले,  निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. ज्यांना संविधानात वेगळा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या दर्जाचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तिथं कोण गेलं. तो विषय महत्वाचा नाही. तथ्य आणि कायदा महत्वाचा आहे. आम्हाला विश्वास आहे की निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह आम्हाला देईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT