महाराष्ट्र

खडकलाटला कर्जाला कंटाळून पती-पत्नीची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

निपाणी -  कर्जाला कंटाळून खडकलाट येथील पती-पत्नीने एकाचवेळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. 19) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुकुमार गुंडू वराळे (वय 42) व सुरेखा सुकुमार वराळे (वय 34) अशी दुर्देवी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सुरेखा वराळे या खडकलाट ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या होती. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, सुकुमार वराळे व सुरेखा वराळे यांच्या अंगावर कर्ज झाले होते. त्यातच सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील तंबाखू पिकांचे संपूर्ण नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत गेल्या दीड महिन्यापासून हे दांपत्य होते. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आत्महत्येचा निर्णय घेऊन दोघांनी राहत्या घरी एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केली, असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. 

सुकुमार वराळे यांचे मित्र व नातेवाईक मोबाईलवर संपर्क साधत होते. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने मित्रांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी शेजाऱ्यांनी घरचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर मधल्या खोलीत पती-पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले. गळफासाची घटना घडल्यामुळे गंभीर अवस्थेतील सुकुमार व सुरेखा यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून त्यांना निपाणीस घेऊन जाण्यास सांगितले. मात्र निपाणीतील रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांना मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती खडकलाट पोलिस ठाण्याला मिळाल्यानंतर फौजदार बसगोंडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान आत्महत्त्येपूर्वी सुरेखा यांनी आपल्या मोठ्या मुलग्याच्या नावे, "आपणास कर्ज झाले असून आत्महत्या करीत आहे. यासाठी कोणासही जबाबदार धरु नये', अशा आशयाची लिहिलेली चिठ्ठी राहत्या घरी मिळाली. 

मृत सुकुमार व सुरेखा वराळे यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा अभिषेक हुबळी येथे 11 वी वर्गात तर लहान मुलगा रोहित हा निडसोशी येथील मोरारजी वसती शाळेत आठवीत शिक्षण घेत आहे. मुलांचा विचारही न करता दोघांनीही जीवन संपविल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT