10th & 12th Board exam Preparation sakal
महाराष्ट्र बातम्या

बेस्ट ऑफ लक! विद्यार्थ्यांनो, अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहा; १० मिनिटे उशिर झाल्यावर प्रवेश नाहीच; पेपरच्या वेळेचे 'असे' नियोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे. पेपर सुरू होऊन दहा मिनिटे झाल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून (बुधवार) बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ५२ हजार ८७० विद्यार्थी परीक्षा देतील. दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याने किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे. पेपर सुरू होऊन दहा मिनिटे झाल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असा बोर्डाचा नियम आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकांसह बैठे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा काळात प्रत्येक तालुक्यात प्रांताधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदांमधील वेगवेगळ्या विभागांचे विभागप्रमुख, विस्ताराधिकारी यांची भरारी पथके वेगवेगळ्या शाळांना अचानक भेटी देतील.

परीक्षा केंद्रावर पोचल्यानंतर हॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती होईल. त्यांना पायातील चप्पल, शूज बाहेरच काढून ठेवावे लागतील. यंदा पाणी वाटप करणाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार नसल्याने तहान लागल्यास विद्यार्थ्यांना त्या वर्गावरील पर्यवेक्षकच पाणी उपलब्ध करून देतील. इयत्ता बारावीच्या गुणांवरून विद्यार्थ्यांना पुढे आवडीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. त्यामुळे प्रत्येकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

परीक्षार्थींनी ‘हे’ जरूर लक्षात ठेवावे

  • परीक्षा सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोचावे.

  • उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर योग्य ठिकाणी बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक, विषय माध्यम, तारीख योग्य रीतीने लिहिल्याची खात्री करा.

  • विद्यार्थ्यांना शेवटी दहा मिनिटे जास्त मिळणार आहेत. त्यावेळी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील माहिती बरोबर असल्याची खात्री करा. तसेच आपण लिहिलेली उत्तरे व त्याच्या प्रश्नांचे क्रमांक बरोबर असल्याचीही खात्री करावी.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची स्थिती

  • एकूण परीक्षार्थी

  • ५२,८७०

  • परीक्षा केंद्रे

  • ११८

  • भरारी पथके

  • ४६

  • बैठे पथके

  • ११८

...तर बैठे पथकावरही होईल कारवाई

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून बोर्डाची परीक्षा सुरू होत असून सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा. सर्वांनी वर्षभर अभ्यास केलेल्या विषयांची परीक्षा आत्मविश्वासाने द्यावी. पेपर सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर हजर राहावे. एखाद्या केंद्रावर कॉपी करताना कारवाई झाल्यास तेथील बैठे पथकावर देखील कारवाई होईल.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

पेपरच्या वेळेचे असे नियोजन

  • पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर वॉनिंग गजर

  • पेपर सुरु व्हायला दहा मिनिटे कमी असताना सर्वांना मिळतील उत्तरपत्रिका

  • पेपर सुरू झाल्यावर सर्वांनाच तत्काळ मिळतील प्रश्नपत्रिका

  • एक तासानंतर व दुसऱ्या तासानंतर (प्रत्येक तासाला) टोल किंवा गजर

  • दहा मिनिटे शिल्लक असताना एक टोल व वेळ संपल्यावर लेखन समाप्तीचा शेवटचा गजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT