police  esakal
महाराष्ट्र बातम्या

सावधान, पोलिसांनी तयार केली 13000 गुन्हेगारांची यादी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस ॲक्शन मोडवर; तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई फिक्स

लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, सामाजिक शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तब्बल १२ हजार ८७३ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. वर्तनात सुधारणा न झाल्यास तडीपार किंवा एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ग्रामीण व शहर पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तब्बल १२ हजार ८७३ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. दोन तथा त्याहून अधिक गुन्हे दाखल झालेल्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांना तडीपार किंवा एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील १० हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. तर अडीच ते तीन हजार गुन्हेगार शहर पोलिसांच्या कारवाईच्या रडारवर आहेत. त्यातील अनेकांना १०७ व ११०अंतर्गत वर्तन सुधारण्यासंदर्भातील नोटीस बजावून त्यांच्याकडून बॉण्ड घेण्यात आले आहेत. शहर पोलिसांकडून शहरातील जवळपास पाचशे ते सहाशे जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. तसेच कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत वर्तनात सुधारणा झाली नाही आणि त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरुच असल्यास त्याला एक ते दोन वर्षांसाठी थेट जिल्ह्याबाहेर तडीपार देखील केले जात आहे.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही कोणी पुन्हा पुन्हा गुन्हे करीत असल्यास किंवा अवैध व्यवसाय करीत असल्यास त्याला एमपीडीएअंतर्गत थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविले जात आहे. ग्रामीण व शहर पोलिस आता ॲक्शन मोडवर असून मागील दहा दिवसांत पाच ते सात जणांवर तडीपारीची कारवाई झाली असून दोघांची रवानगी येरवाडा कारागृहात देखील केली आहे.

१० वर्षांत वाढले साडेपाच हजार गुन्हेगार

२०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील साडेचार हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. २०१९च्या निवडणुकीवेळी ही संख्या सहा हजारांवर गेली आणि आता २०२४मध्ये ही संख्या दहा हजारांवर पोचली आहे. दहा वर्षांत गुन्हेगारांची संख्या तब्बल साडेपाच हजाराने वाढली आहे. शहर पोलिसांकडे सात पोलिस ठाण्याअंतर्गत तीन हजारांपर्यंत गुन्हेगार आहेत.

अडीचशे जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी २०२३मध्ये मोक्काअंतर्गत दोघांवर, हद्दपारीची कारवाई सात टोळ्यांवर, एमपीडीएअंतर्गत आठ जणांवर, ५६ व ५७ प्रमाणे ७४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यावर्षी सात जणांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत, चार टोळ्यांवर मोक्काअंतर्गत, १० टोळ्यांवर हद्दपारीची आणि ५६ प्रमाणे ७५ जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दुसरीकडे शहर पोलिसांनी देखील ६९ जणांचे तडीपारीचे तर ४३ जणांचे स्थानबद्धतेचे व १४४(२)अंतर्गत ३५ जणांचे प्रस्ताव तयार केले आहेत. आता त्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे.

वर्तनात तत्काळ सुधारणा अपेक्षित, अन्यथा...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची यादी तयार केली असून अनेकांचे हद्दपारीचे व स्थानबद्धतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. या गुन्हेगारांच्या वर्तनात तातडीने सुधारणा अपेक्षित आहे. दंडाधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडून बॉण्ड घेतले आहेत, त्या गुन्हेगारांनी त्यातील शर्थीचे उल्लंघन केल्यास ते बॉण्ड रद्द करून त्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

----------------------------------------------------------------------------------------

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई

गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईतांवर कठोर कारवाई (तडीपार व स्थानबद्धता) प्रस्तावित केली जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून पोलिस ठाणेनिहाय आरोपींची यादी तयार केली आहे. आरोपींच्या वर्तनात सुधारणा न झालेल्या किंवा वर्तन न सुधारणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाया होतील.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, शहर पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT