Bhagat Singh Koshyari 
महाराष्ट्र बातम्या

Bhagat Singh Koshyari:...म्हणून 12 आमदारांच्या फाईलवर सही केली नाही; कोश्यारींनी सांगितलं कारण

ठाकरेंचं पत्र राज्यपालांच्या जिव्हारी

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. आता राजीनामा दिल्यानतंर त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. विशेष त्यांच्या काळात गाजलेला मुद्दा म्हणजे 12 आमदारांच्या फाईलवरील सही. जी अखेरपर्यंत त्यांनी केली आहे. त्यावरुन अजून वाद सुरुच आहे. अशातच यामागचे कारण स्पष्ट केलं आहे. (Bhagat Singh Koshyari 12 mla appointmen letter Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती, पण राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईलपर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला मंजुरी दिलीच नाही. कोर्टातही हे प्रकरण गेलं, पण त्यानंतरही भगतसिंह कोश्यारी यांनी फाईलवर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण अजुनही तसेच आहे.

Bhagat Singh Koshyari: 'उद्धव हे संत व्यक्ती, ते राजकारणात कुठे अडकले'; कोश्यारींकडून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य

उद्धव ठाकरेंवर कोश्यारींचा रोख

मुंबई तक ला दिलेल्या मुलाखतीत कोश्यारी बोलत होते. विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही. स्वाक्षरी न करण्याचं कारणही तुम्ही सांगितलं नाही. या प्रश्नाला उत्तर देताना कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले.

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा मोठा खुलासा; म्हणाले, "अजित पवार स्वतःहून आले अन्..."

महाविकासआघाडीची शिष्य मंडळ येत राहिलं. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचं पत्र आहे. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात गेलं. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात. आणि शेवटी लिहिता की, 15 दिवसांत मंजूर करा. कुठे लिहिलंय की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की, मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा.

संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता. अशा शब्दात कोश्यारी यांनी कारण सांगत संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jayakumar Gore: ‘उन्होंने खुद के गिरेबान में झाँकना चाहिये...’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते-पाटलांना टोला

Punjab Floods : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, लासलगावहून ४० टन कांदा रवाना; व्यापाऱ्यांचा पुढाकार

आयुषचा मृतदेह हत्येच्या ३ दिवसानंतरही ससूनमध्येच, अंत्यसंस्काराला इतका वेळ का?

IPS Anjana Krishna: 'आयपीएस अंजना कृष्णा यांना समर्थन वाढू लागले'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची संभाषणाची क्लिप देशभर व्हायरल

Maratha Reservation : मराठा आरक्षण, १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ मराठा कुटुंबांना मदतीचा दिलासा

SCROLL FOR NEXT