bhagat singh koshyari and raj thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : कोश्यारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का? राज्य ठाकरेंच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमूख राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांचे ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

सकाऴ वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमूख राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांचे ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमूख राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांचे ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यापैकी त्यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाला संबोधून केलेले ट्विट बुधवारी दिवसभर चर्चेत राहिले, कोशियारी राज्यपालासारख्या महत्वाच्या संविधानिक पदावर आहेत, त्या पदाचा मान राखून काही फार बोलत नाहीये. अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांना काही कमी नाही. पण कधी वाटतं की महत्वाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष व्हावं म्हणून कोशियारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का ? असा प्रश्न या ट्विटमधून ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

अडिच वर्षाचे महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर सत्तांतरण होत एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणविस यांचे युती सरकार स्थापन केले असून, पुढील अडीच वर्षाची धुरा सांभाळून आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असून, देशात महागाई शिगेला पोहचली आहे. पेट्रोल,डिझेल, सीएनजी, जिवनावश्यक खाद्य पदार्थ, घरगुती गरजू वस्तू आणि प्रत्येकांच्या घरातील सिलेंडरच्या दराची प्रचंड वाढ झाली आहे. त्याशिवाय राज्यात नुकताच ओला दृष्काळामूळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणे करावे लागले आहे. शासनाच्या भरती प्रक्रियांमध्ये घोटाळे होत असल्याने वेळोवेळी परिक्षा रद्द केल्या जात आहे. अशा अनेक मुलभूत मुद्यांवर चर्चाच होत नसून, या मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हेतुपूरस्पर रोज नवनवे वाद निर्माण तर केल्या जात नाही ना? अशी शंका राज ठाकरे यांनी आपल्या ट्विट मधून व्यक्त केली आहे. त्याशिवाय राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का असे म्हणत अप्रत्यक्ष राज्यासह देशातील सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT