Bhalchandra Nemade esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhalchandra Nemade : ''माहिती नसताना जास्त बोलणं सुरु आहे'' औरंगजेब वादानंतर नेमाडे नेमकं काय म्हणाले?

संतोष कानडे

मुंबईः औरंगजेब आणि पेशव्यांवरील विधानानंतर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आज मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी एक विधान करुन पुन्हा चर्चा घडवून आणली.

भालचंद्र नेमाडे यांचा आज एक कार्यक्रम मुंबईत झाला. अधांतर नाटकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 'अधांतर : भूमी व अवकाश' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या ग्रंथाचे प्रकाशन नेमाडे यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना नेमाडे म्हणाले की, माहिती नसणं आणि जास्त बोलणं, याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. यातून कसा मार्ग काढायचा हा एक प्रश्नच आहे. सध्या बकवास सुरु आहे त्यामुळे देश कसा चालतोय, असा प्रश्न पडतोय.

पुढे बोलतांना नेमाडे म्हणाले की, अधांतर हा दुर्मिळ ग्रंथ म्हणावा लागेल. कुठे तरी आपल्यात प्रत्येकात एक संस्कृती असते, जी नाटकात दिसते. जगात कॅपिटलीझम वाढलंय त्यामुळे वाटतं की पुढे काय होणार? सगळी कामं रोबोट करत आहे. यंत्र माणसांना संपवणार आहे. कलाकाराला जे कळतं ते भेसूर सूत्र जयंत पवार यांनी लेखात मांडल्याचं नेमाडेंनी सांगितलं.

नेमाडे काय म्हणाले?

प्रत्येकाला आपल्या गावातील लोक जवळचे वाटतात. शहरात असं नाही, बाजूला कोण राहतं, हे आपल्याला पाच-पाच वर्षे कळत नाही. दुरावा वाढत जातो आणि शेवटी सगळं आपल्या घरापर्यंत देखील येतं. हे सगळं अधांतरमध्ये दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT