Sadabhau Khot Rayat Kranti Party  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली! सदाभाऊ खोतांच्या पक्षातील बडा नेता लागला गळाला

Sharad Pawar Latest News : सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणात हलचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून यादरम्या आमदार सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंदर पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पुण्यातील शरद पवारांच्या मोदी बाग कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला,

शेतकरी चळवळीतील नेते स्वर्गीय शरद जोशी ते शरद पवार असा हा प्रवास शिंदे यांचा झाला असून यामध्ये गेली 25 वर्ष ते सातत्याने शेतकरी चळवळीत काम करत होते 1999 पासून शेतकरी चळवळ मध्ये कामाला सुरुवात केली. शाखा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्य प्रवक्ता ते रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशाप्रकारे यापूर्वी त्यांनी पद घेऊन शेतकरी चळवळीत काम केले. या कालावधीमध्ये शरद जोशी यांच्या सोबत तसेच माजी खासदार राजू शेट्टी, तसेच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी काम केले.

वेगवेगळी शेतकरी आंदोलन ऊस आंदोलन दूध आंदोलन, कर्जमुक्ती आंदोलन या सर्व आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून वेळोवेळी आंदोलने केली तसेच ऊसदर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. शेतकरी चळवळी मध्ये असताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम केले. आता यापुढे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित शेतकऱ्यांच्यासाठी काम केले जाईल व राज्यभरामध्ये शेतकरी हिताची कामे केली जातील, असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगटाचे जिल्हाध्यक्ष शेवाळे, प्रदेश सचिव नामदेव बापू ताकवणे, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते अर्जुन कोर्हाळे, भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक महादेव चौधरी, प्रगतशील बागायतदार खंडागळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ झाला असता, एकनाथ शिंदे सभागृहात संतापले! विरोधकांचेही टोमणे

"कुर्ला टू वेंगुर्ला"मधून उलगडणार 'एका लग्नाची गोष्ट'; मुख्य भूमिकेत दिसणार 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेता

Latest Marathi News Updates : अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

farmer Success Story :'दोडक्याने दाखवली कर्जमुक्तीची वाट'; जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पादन खर्चात झाली बचत

Hinjewadi Connectivity: ‘आयटी’ला मिळणार जलद ‘कनेक्टिव्हिटी’; रस्ता रुंदीकरणाचा फायदा

SCROLL FOR NEXT