Sam_Kiran_Manish
Sam_Kiran_Manish 
महाराष्ट्र

भानुशाली, गोसावी, डिसूझा हेच 'आर्यन' प्रकरणाचे मास्टरमाईंड - सुनील पाटील

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी नाकारला आहे. भाजपचे कार्यकर्ते मोहित कुंभोज यांनी हा आरोप केला होता. आपल्यावरील आरोप नाकारताना पाटील यांनी अनेक खुलासे केले असून मनीष भानुशाली, किरण गोसावी, सॅम डिसूझा हेच आर्यन खान प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

सुनील पाटील म्हणाले, माझा आर्यन खान प्रकरणाशी संबंध नाही. या प्रकरणाचे मास्टरमाइंड मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसूझा हेच आहेत. माझा मनीष भानुशालीसोबत संपर्क आहे गेल्या दहा-बारा वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो कारण तो माझा मित्र आहे. कार्डिलिया क्रूझ रेव्ह पार्टीचं प्रकरण घडलं तेव्हा मी माझ्या कंपनीच्या एका टेंडरच्या कामानिमित्त अहमदाबादमध्ये होतो. तर सॅम, मनीष आणि केपी गोसावी हे त्या रात्रभर मुंबईत होते. २७ ते ४ तारखेपर्यंत मी अहमदाबादमध्येच होतो. मला मनीषनं रात्री अडीज वाजता सांगितलं की, त्या ठिकाणी शाहरुख खानचा मुलगा देखील आहे. यानंतर रात्रभर त्यांच्या बैठका सुरु होत्या. मला सकाळी साडेआठ वाजता फोन आला आणि या प्रकरणात ५० लाख रुपये टोकन दिल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गोसावी मला म्हणाला की पैसे कुठे ठेऊ? प्रभाकरला याप्रकरणात पैसे मिळाले याचवेळी त्याचा आणि माझा संपर्क झाला. हे पैसे त्यानं कुठे ठेवलेत माहिती नाही. या व्यतिरिक्त मला काहीही माहिती नाही. यांच्यामध्ये डील कधी झाली? कितीची झाली? याची मला माहिती नाही. मयूर घुलेलाही मी आजपर्यंत कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. सॅमचा तो जवळचा मित्र आहे. रात्री ११ वाजता या मयुरचा मला फोन आला की, सॅमनं सांगितलं की, काम झालेलं नाही पैसे परत द्या. त्यावर मी केपी गोसावीला शिव्या घातल्या. तू पैसे दिले आहेत तर त्यांना परत करं, असंही सुनील पाटील यांनी स्पष्ट केलं.

आर्यनची पहिली टीप कोणाला मिळाली?

सुनील पाटील म्हणाले, "आर्यन प्रकरणाची मला कुठलीही टीप मिळाली नाही, ही टीप मनीष भानुशालीला मिळाली. त्याआधी मला त्याचा खास मित्र धवल भानुशाली आणि नीरज यादव यानं फोन केला होता. त्यादिवशी किरण गोसावी आणि मनीष भानुशाली गांधीनगरला मंत्रालयात गेले होते. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता त्यांचा मला फोन आला की कार्डिलिया क्रूझ जाणार आहे, तिथं रेव्ह पार्टी होणार आहे. तुमचं काही एनसीबीचा संपर्क असेल तर द्या आणि रेड करा. मी त्यांना म्हटलं, माझं हे काम नाही, मी हे काम करत नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या"

सुनील पाटील आणि NCB चा संबंध काय?

नीरज यादव हा मध्य प्रदेशातील भाजपचा कार्यकर्ता असून तो मोठ-मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असतो. त्यानं एकदा भाजप नेते कैलास विजयवर्गीयाचं त्यानं नाव घेतलं होतं. त्यांचे फोटोही त्याने मला व्हॉट्सअॅपला पाठवले. सॅम डिसूझा आणि माझा एक वर्षापूर्वी संपर्क आला. माझ्या एका मित्राच्या माध्यमातून तो आमच्याकडे यायला लागला. सॅमला कॅडेलिया ड्रग्ज प्रकरणाची माहिती देण्याचा माझा एकच हेतू होता की, सॅमला ड्रग्ज प्रकरणात चार महिन्यांपूर्वी एनसीबीनं समन्स पाठवलं होतं. यावेळी त्यानं मला विचारलं होतं की, मला प्रकरण मिटवण्यासाठी एनसीबीवाल्यांना पैसे द्यायचे आहेत. माझ्याकडे पैसे कमी आहेत पाच ते दहा लाखांची मदत कर. एकूण किती पैसे द्यायचे असं मी विचारलं तर तो म्हणाल २५ लाख रुपये द्यायचे आहेत. मी म्हटलं ठीक आहे सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. यानंतर त्यानं पुन्हा दुसऱ्यांदा फोन केला आणि म्हणाला तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर माझं काम होणार नाही का? मी एनसीबीवाल्यांना पैसे दिले आणि आता सुटलो आहे. हीच घटना माझ्या लक्षात होती त्यामुळं मी किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांना सांगितलं की सॅमचा आणि एनसीबीचा संपर्क आहे. तुम्ही त्याच्यामार्गे एनसीबीपर्यंत जाऊ शकता.

सुनील पाटील आणि राष्ट्रवादीचा संबंध काय?

सुनील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेल्या आपल्या संबंधाबाबत सांगताना म्हटलं की, मी सन १९९९ पासून सन २०१६ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. त्यानंतर मी राजकारणापासून दूर झालो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT