Bharat Bandh 
महाराष्ट्र बातम्या

Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात आज सर्वपक्षीय 'भारत बंद' 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला विरोधकांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले आहे. कॉंग्रेसच्या आवाहनाला शिवसेना वगळता इतर बहुसंख्य राजकीय पक्ष, संघटना यांनी प्रतिसाद दिला असून, बंदमध्ये ते सामील होणार आहेत. शिवसेनेने मात्र बंदमध्ये सहभागी होण्याचे टाळले आहे. 

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला नाही. याबाबत शिवसेनेचे प्रवक्‍ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले, की देशातील विरोधी पक्षांना फार उशिरा जाग आली आहे. शिवसेना आधीपासून महागाई वाढल्याचे सांगत आहे. महागाईच्या विरोधातील लढ्यात विरोधक जेव्हा अपयशी ठरतील तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये ठिकठिकाणी बंदचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, कायदा आणि सुव्यवस्था चोख राहावी, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. 

बंदला पाठिंबा देणारे पक्ष 
कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या "भारत बंद'ला राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठिंबा दिला असून, राज्यात जेथे शक्‍य असेल तेथे मनसैनिकांनी आंदोलन करावे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे. 

सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तसेच, या बंदमध्ये सामील होण्यासाठी शिवसेनेशी संपर्क केला होता. हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापारी बांधवांचे, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी. 
- अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष 

"भारत बंद'च्या पार्श्‍वभूमीवर कडक बंदोबस्त 
सोमवारी पुकारण्यात आलेल्या "भारत बंद'दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांतर्फे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंददरम्यान तोडफोड, नागरिकांची अडवणूक करून त्यांना त्रास दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिला आहे. 

कॉंग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांनी सोमवारी "भारत बंद'चा इशारा दिला आहे. या आंदोलनासाठी शहर पोलिसांच्या सर्व पोलिस उपायुक्तांच्या माध्यमातून सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी या आंदोलनासाठी तैनात करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनातर्फे आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्याचे बोडखे यांनी सांगितले. 

या आंदोलनावेळी कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी, दगडफेक, तोडफोड, सार्वजनिक किंवा एखाद्याच्या खासगी मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी सीसीटीव्हीद्वारे सगळीकडे लक्ष ठेवले जाणार आहे. तोडफोड किंवा लोकांना त्रास देणाऱ्यांची सीसीटीव्हीद्वारे पाहणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

अनेक विरोधी पक्ष सहभागी 
नवी दिल्ली : इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने उद्या (सोमवारी) पुकारलेल्या "भारत बंद'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, देशभरात निदर्शने केली जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन आणि डाव्या नेत्यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शविला आहे. त्याचवेळी तृणमूल कॉंग्रेसने मात्र निदर्शनांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूलने प्रत्यक्ष सहभागी न होता या मुद्यावर पाठिंबा दर्शविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT