vijay wadettiwar 
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : भरत गोगावलेंच्या विधानाने सत्तेची साठमारी दिसून आली; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

रवींद्र देशमुख

मुंबई - एकनाथ शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी आज केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. गोगावले यांनी आपलं मंत्रीपद कसं हुकलं, याविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यावर आता प्रतिक्रिया येत असून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत विधान केलं आहे. ठाणे येथील रुग्णालयाला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमध्ये किती आलबेल आहे, हे भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरुन दिसते आहे. ही निव्वळ सत्तेची साठमारी आहे. आता तिजोरी लुटण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटलं की, सगळे पर्याय संपले की भाजपला गांधी परीवार दिसतो. असं आहे तर मग त्यांना राष्ट्रवादीची गरज का पडते आहे? पंतप्रधान पदी गांधी घराण्यातील कोण होते? त्यांनी केवळ गांधी घराण्याची भीती वाटते, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.

ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूवर वडेट्टीवार म्हणाले की, ठाण्यात परमन्ट जागा भरल्या जात नसतील तर इतर राज्यात काय परीस्थिती असेल, हे सांगायची गरज नाही. ते पुढं म्हणाले की, कळवा हॅास्पिटलमध्ये तज्ञ डॅाक्टर नाहीत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. पॅरामेडीकल स्टाफ नाही.

छ. शिवाजी महाराजांचे नाव घेवून हे हॅास्पिटल सुरु केले गेले. या रुग्णालयाची लागलेली वाट पाहता त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे हॅास्पिटल सरकारकडे द्यावे अशी मागणी केली होती, अशी आठवणही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT