Rahul Gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra : बिरसा मुंडा कधीही सावरकरांप्रमाणे ब्रिटिशांपुढे झुकले नाहीत - राहुल गांधी

आपण शूर आहोत हे सांगायला सावरकरांनी स्वतःच वेगळ्या नावाने पुस्तक लिहिलं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. दलित, आदिवासी आणि गरीबांना अधिकार मिळू नयेत यासाठी भाजपा संविधानावर रोज हल्ला करत असतं, अशी टीका केली आहे. तसंच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलही विधान केलं आहे. (Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra on VD Sawarkar)

भारत जोडो यात्रेचा आज ७० वा दिवस असून ही यात्रा काल वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. काल बिरसा मुंडा जयंतीनिमित्त राहुल गांधींनी दुपारी एक सभा घेतली. या सभेमध्ये आदिवासी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुलना केली आहे. बिरसा मुंडा आपल्या आदर्शांवर ठाम होते, असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सावरकर आणि बिरसा मुंडा यांची तुलना करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, "ते (मुंडा) एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासीचं प्रतिक आहेत आणि आपल्याला मार्ग दाखवतात. भाजपाचं प्रतिक सावरकर आहेत. ते दोन तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले होते. त्यांनी दया याचिका लिहायला सुरुवात केली होती." सावरकरांनी स्वतःच वेगळ्या नावाने एक पुस्तक लिहिलं आणि आपण किती शूर आहोत, हे सांगितलं. तसंच सावरकर काँग्रेसच्या विरोधात काम करायचे आणि इंग्रजांसाठी काम करुन त्यांच्याकडून पेन्शन घ्यायचे, असंही राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT