Dr. Bharati Pawar  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाचे रुग्ण वाढले, सतर्क राहा ! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे आवाहन

देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर घाबरण्याचे कारण नाही. पण सतर्क राहा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी गुरुवारी (ता.२१) केले. औरंगाबाद (Aurnagabad) येथील चिकालठाणा विमानतळावर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. पवार म्हणाल्या, की कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र, मिझोराम, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि दिल्लीत पुन्हा कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संबंधित राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. राज्याने सुद्धा केंद्राच्या सूचनेप्रमाणे काम करावे. (Bharati Pawar Say, Corona Cases Increases, Be Alert)

रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याची गरज नाही. परंतु सण-उत्सव आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी. यावेळी भाजपचे पदाधिकारी तथा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती.

मंत्र्यांच्या खर्चाच्या प्रश्नावर जोडले हात

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सरकारी खर्चाने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत लाखो रुपये खर्च केले. कोरोना काळात सामान्य माणसाला बेड, ऑक्सिजन मिळत नसताना मंत्र्यांनी मात्र जनतेचा पैसा स्वतःच्या उपचारावर खर्च केला.

यावरून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात डॉ. भारती पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अक्षरशः हात जोडत यावर बोलणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT