Devendra Fadnavis and Chandrakant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Battle: "भाजप नेत्यांनी अद्याप फडणवीस-शिंदेंना पेढे का भरवले नाहीत"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्ष कोणाचा याचा पेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणूक आयोगाने या संदर्भात शनिवारी निकाल देत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे. यावर आतापर्यंत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाचा शिवसेनेच्या अस्तासाठी देवेंद्र फडणवीसांवरच रोष दिसून येत आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, या देशातील अनेक राज्यांमधील सरकारे बदलली. कितीही राजकीय विरोधक असला तरी तो मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर आतापर्यंत कधीही कोणी पेढे भरवले नाही.

आमची भाजपसोबत २५ वर्षे मैत्री होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना पेडे भरवत होते. मात्र आता शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे अजुन कसे फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना पेढे भरवत नाहीत, याचं मला आश्चर्य वाटत असल्याचं जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान आम्ही लढू, आम्ही जिंकू, आम्ही मोडू पण आम्ही वाकणार नाही, असं म्हणत जाधव यांनी भाजपला इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT