महाराष्ट्र बातम्या

Bhaubeej 2023 : सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिली साडी भेट; खासदार सुळे म्हणाल्या...

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी: काटेवाडी येथे पवार कुटुंबियांचा भाऊबीज कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी औक्षण केले. तर सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या साडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर आभार मानले.

दिवाळी पाडव्यानिमित्त काल उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथेप्रमाणे गोविंद बागेत हजेरी लावली होती. तर बुधवारी (ता. १५) भाऊबीजनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले होते.

राजकीयदृष्ट्या मतभेद झाले तरी दिवाळी सणाला पवार कुटुंब एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच दिवाळी उत्सव साजरा होत आहे. बारामती येथे काल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पक्षीय फूट व अजित पवार गटाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. या दिवाळी उत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील थेट माध्यमांसमोर येणे टाळले.

दरम्यान, भाऊबीज निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी अजित पवार यांच्या पाठोपाठ यांचे बंधू श्रीनिवास पवार, उद्योजक रणजीत पवार , जयंत पवार यांना सर्व बहिणींनी मिळून औक्षण केले. सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना साडी भेट दिल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले.

राजकीय मतभेद बाजूला ठेवत बुधवारी पवार कुटुंबियांनी काटेवाडीमध्ये भाऊबीज सणानिमित्त एकत्र येत सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व बहिणींनी औक्षण केलं. अजित पवारांपाठोपाठ श्रीनिवास पवार, उद्योजक रणजीत पवार, जयंत पवार यांनाही सर्व बहिणींनी मिळून औक्षण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Election Fraud: मतदानानंतर उघड झाला मोठा खेळ! ‘या’ राज्याच्या निवडणुकीत अवैध मतदान; १० विदेशी नागरिकांसह चार महिला अटकेत

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT