Elgar Parishad Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Elgar Parishad Case: एल्गार परिषद प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाने महेश राऊतला जामीन केला मंजूर

महेश राऊतवर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने महेश राऊतला जामीन मंजूर केला आहे. महेश राऊतवर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

दरम्यान 12 सप्टेंबर 2023 रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीवेळी आरोपी महेश राऊतच्या जामीन अर्जावर त्याच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटलं होतं की, महेश राऊत प्रतिबंधित माओवादी पक्षाशी संबंध आहे. तर आरोपीचे वकीलांनी त्याच्या सहभागाबद्दलचा पुरावा नसल्याचा, युक्तिवाद केला आहे.

त्या जोरदार युक्तिवादानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज महेश राऊतला जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर या निर्णयाला आव्हान देण्यासाठी एनआयएला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. महेश राऊतच्या जामीन अर्जाला एनआयएने विरोध केला होता.

एल्गार परिषदेशी कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून महेश राऊतला 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात अटक करण्यात आली होती. आज त्याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख गडकरी यांच्या खंडपीठाने राऊतचा जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT