Bhimashankar: भीमाशंकर पर्यटनासाठी दोन महिने बंद, वाचा काय आहे कारण sakal
महाराष्ट्र बातम्या

Bhimashankar: भीमाशंकर पर्यटनासाठी दोन महिने बंद, वाचा काय आहे कारण

Latest Marathi News: धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Pune: वन्यजीव अभयारण्य पावसामुळे निसरडया झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत सदर निसर्गवाटा ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्य क्र.१ चे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.

भीमाशंकर अभयारण्य परिसरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन व सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेले धबधबे, पाऊस, धुके यांचा वर्षा ऋतुमध्ये देवदर्शन व पर्यटन असा दोन्ही आनंद घेण्यासाठी भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणात भीमाशंकरला येत असतात.

मात्र यावर्षी वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य १ व वनपरिक्षेत्र अभयारण्य २ भीमाशंकर मधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून वनपरिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य १ व २ यांच्या वतीने या धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

भीमाशंकर वन्यजीव अभयाण्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेल्यामध्ये कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग, खोपीवली नियतक्षेत्र येथील चोंडीचा धबधबा, पदरवाडी जवळील न्हाणीचा धबधबा, नारीवली नियतक्षेत्रातील सुभेदार धबधबा, खांडस ते भीमाशंकर मार्ग येथील घोंगळ घाट नाला व शिडी घाट येथील पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांचे वतीने भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना वर्षाविहारात नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे व परवानगीशिवाय अवैध्यरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये असे अवाहन करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT