Bhushan Desai first reaction subhash desai after joining shivsena eknath shinde fraction maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Bhushan Desai News : भूषण देसाईंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला? स्पष्टच सांगितलं कारण…

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामिल होणाऱ्यांची रिघ लागल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या अनेक निष्ठावंतांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये आता सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांची देखील भर पडली आहे.

उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत राहीलेले सुभाष देसाई यांचा चिरंजीव भूषण देसाई यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाईंंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाळासाहेब हेच माझं दैवत आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरं काही माझ्यासमोर आलेलं मला आठवत नाही.

ते पुढे म्हणाले की, हिंदूत्वाचा विचार राज्यासाठी साहेबांनी पाहिलेलं स्वप्न जर कोणी पुढे घेऊन जात असेल तर शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. म्हणून माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मी त्यांच्यासोबत जवळून काम केलं आहे. त्यांचा वेग आणि क्षमता मी जवळून अनुभवल्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

एक छोटा कार्यकर्ता होतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामाजिक कार्य करत होते, पण शिंदे साहेबांना बघत त्यांच्यावरून प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भूषण देसाई म्हणाले.

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने प्रवेश?

सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना तुमच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला का? या प्रश्नाला उत्तर देताना भूषण देसाई म्हणले की असं काही नव्हतं. तुम्हाला माहिती मिळून जाईल. साहेबांनी पाच शतकं तिथं काम करत आहेत. पण माझा स्वतंत्र विचार असू शकतो ना.. मी इतर नेत्यांबरोबर काम करू शकतो. कमाची पध्दत आवडल्याने इथं आलो आहे.

माझा सुभाष देसाई यांच्याशी स्पष्ट बोलणं झालं आहे. मी हा निर्णय फार आधी घेतला आहे. सरकार निर्णय सरकार स्थापन झालं तेव्हाच हा निर्णय घेतला होता, असेही भूषण देसाई म्हणाले.

पक्षात जबाबदारी काय असेल य़ावर बोलताना साहेब जे सांगतील ते, पक्षातील इतर नेते आमदार सांगतिल तसं काम करणार असल्याचे भूषण देसाई यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT