Subhash-Desai
Subhash-Desai sakal
महाराष्ट्र

Subhash Desai : 'त्यांचं राजकारणात काहीच काम नाही' लेकाच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः उद्धव ठाकरे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश झाला.

मुलागा भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशानंतर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भूषण देसाई यांचा शिवसेना प्रवेश होणं हे क्लेशदायक आहे. त्यांचं शिवसेना किंवा राजकारणात काहीही काम नाही. त्यांच्या कुठल्याही पक्षात जाण्याचे परिणाम होणार नाहीत. ठाकरे परिवाराशी पाच दशकांहून अधिक काळ असलेली निष्ठा कायम राहणार, असं सुभाष देसाई म्हणाले. 'टीव्ही ९'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचाः देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतमध्ये भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश झाला. यानंतर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भूषण देसाई यांनी काम करणाऱ्या लोकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. राज्यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार स्थापन झालं आहे. त्यांची भूमिका आणि विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत.

सुभाष देसाई ठाकरेंचे निष्ठावान...

सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्यांपैकी एक आहेत. गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधित्त्व करत आहेत. 1990 मध्ये पहिल्यांदा सुभाष देसाई हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा निवडणुकीत विजयी झाले. 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT