ujani dam solapur
महाराष्ट्र बातम्या

मोठी दुर्घटना! उजनीच्या पात्रात बोट उलटून सहाजण बुडाले; 10 मिनिटांची झूंज अपयशी; ग्रामीण पोलिसातील फौजदार पोहत पोहत काठावर आला अन्‌ घटना उघड झाली

उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहाजण बुडाले आहेत. या दुर्घटनेत एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे.

तात्या लांडगे

करमाळा/चिखलठाण/ सोलापूर : उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहाजण बुडाले आहेत. या दुर्घटनेत एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती. त्यात कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट उलटली. कुगाव ते काळाशी दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट १० ते १५ फेऱ्या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली. धरणात बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीतील एकजण पोहून कडेला आला.

पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे काठ गाठला व आपला जीव वाचवला. ही सर्व घटना पाहून ते अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते. राहुल डोंगरे यांना प्राथमिक उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डोंगरे यांनी धाडसाने पाण्याबाहेर पोहत येऊन ही घटना कळाशी ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तत्काळ ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र पाण्यात काहीही दिसून आले नाही. हे प्रवासी पाण्यात बुडाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, बचाव कार्य वेगाने सुरू आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांपैकी कोणीही सापडले नव्हते. या घटनेची माहिती समजताच कुगाव व परिसरातील ग्रामस्थ, तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

बोट उलटून बुडाल्यांची नावे

गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.

बोटीच्या साह्याने उशिरापर्यंत शोधकार्य

या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. बोट उलटून बुडलेल्यांचा चार बोटींच्या माध्यमातून शोध सुरू आहे. तसेच एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरूच होती. मात्र, अंधारामुळे काहीही हाती लागले नाही. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याविषयी माहिती घेतली.

शेवटची १० मिनिटांची झूंज देखील अपयशी

कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस व जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले व बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्याने दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास दहा ते १५ मिनिटे सुरू होता. मात्र, जोराच्या वादळामुळे त्यांची झूंज अपयशी ठरली व पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली. यावेळी ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला व स्वतःचा जीव वाचविला. ही सर्व थरार त्यांनी कथन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT