Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

MNS Politics: मनसेला खिंडार! गजानन काळेंवर आरोप करणारे मुंबईचे उपशहर प्रमुख शिंदे गटात

पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून दिला राजीनामा

अंकिता खाणे (Ankita Khane)

नवी मुंबईमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी दीड महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण दीड महिन्यांमध्ये घोरपडे यांची भेट घेण्यासाठी मनसेचा कोणताही नेता किंवा पदाधिकारी गेला नाही. पक्षातील एकानेही त्यांची समजूतही काढली नाही. घोरपडे यांनी जे आरोप केले होते त्याचीही दखल घेतली गेली नाही.

घोरपडे यांच्या आरोपानंतरही नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांना समजही देण्यात आली नाही. त्यामुळे घोरपडे नाराज होते. अखेर या नाराजीतूनच प्रसाद घोरपडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. घोरपडे यांनी अखेर (शिंदे गटा) शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नवी मुंबईतील मनसेची गळती सुरूच आहे. नवी मुंबई मनसेचे उप शहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजनान काळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

गजनान काळे हे धमकी देत असल्याचा आरोप घोरपडे यांनी केला होता. हा आरोप करत त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. पदांचा राजीनामा दिला असला तरी आपण पक्षातच राहून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

प्रसाद घोरपडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून पक्षातील अंतर्गत कलहाची दखल घेतली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल अशी घोरपडे यांची अपेक्षा होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पक्षश्रेष्ठींना विनंतीही केली होती. पण जवळपास दीड महिन्यात कोणीच याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाकडून घोरपडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT